Download App

Manoj Jarange : ओबीसींच्या सभा घेतल्याने भुजबळांवरील तीन केसेस मागे; जरांगे यांचा गंभीर आरोप

Image Credit: Letsupp

Manoj Jarange : राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करत अधिसूचनाही काढली. त्यानंतर आज (31 जानेवारी) जरांगे यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळांवर (Chhagan Bhujbal) गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, अशाप्रकारे चॅलेंज देऊन आणि ओबीसी बांधवांच्या सभा घेऊन भुजबळ राजकीय पोळी भाजत आहेत. भुजबळ यांच्यावरील तीन केसेस मागे घेतल्या आहेत.

भुजबळ यांच्यावरील तीन केसेस मागे…

यावेळी भुजबळांवर बोलताना जरांगे म्हणाले की, भुजबळ यांना वयाने एक मोठा व्यक्ती म्हणून माझी पुन्हा विनंती आहे की, त्यांनी अशी आव्हान देऊ नयेत. कारण आम्हाला कुणाच्या मुलांचं वाटोळ करून आमच्या मुलांचे भलं करायचं नाही. मात्र आम्ही सुद्धा पुरावा असल्याशिवाय बोलत नाही. त्यामुळे ओबीसी बांधवांनी त्यांना एकदा समजून सांगावं की, तुमच्या राजकीय स्वार्थासाठी तुम्ही गोरगरीब मुलांचं वाटोळ करू नका. अशाप्रकारे चॅलेंज देऊन आणि ओबीसी बांधवांच्या सभा घेऊन भुजबळ राजकीय पोळी भाजत आहेत. भुजबळ यांच्यावरील तीन केसेस मागे घेतल्या आहेत.

चिनी सैनिकांकडून लडाखमध्ये भारतीय मेंढपाळांना धक्काबुक्की, व्हिडिओ व्हायरल

त्यांना जर खरंच ओबीसी बांधवांची काळजी असते. तर त्यांनी धनगर आरक्षण आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली असती. मी तसे त्यांना आव्हान दिलं होतं. तसेच बारा बलुतेदार जातींच्या आरक्षणाबद्दल देखील ते भूमिका स्पष्ट करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या राजकीय स्वार्थापोटी सामान्य ओबीसींच आरक्षण घालून बसतील. त्यांनी आमचं आरक्षण घालवण्यासाठी प्रयत्न केला.

शिंदेंनी इशारा करायचा अन् चहल यांनी नाचायच… ठाकरेंचा वाघ मुख्यमंत्री अन् BCM आयुक्तांवर भडकला

तसेच राजकीय आरक्षणाबाबत आम्हाला कोणीच विचारलेले नाही. पण आम्हाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण माळायला हवे आहे. पण जे फायदे ओबीसींना आरक्षणामुळे मिळत आहेत. ते आम्हाला मिळायला हवेत. अस म्हणत जरांगे यांनी यावेळी एक प्रकारे मराठ्यांना राजकीय आरक्षणाची मागणी देखील केली आहे.

follow us

वेब स्टोरीज