Download App

चालतानाच कोसळले; मनोज जरांगेंची तब्येत खालावली; मंत्री शंभूराजे देसाईंची उपचार घेण्याची विनंती

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आमरण उपोषणामुळे प्रकृती खालावली आहे. मनोज जरांगे यांना शंभूराजे देसाई यांचाही फोना आलाच.

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange Health : अमरण उपोषणामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची प्रकृती खालावली आहे. मनोज जरांगे समर्थक आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी उपचार घेण्याची विनंती केली होती. अखेर मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री पावणेदोन वाजता उपचार घेतले.

अखेर भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा दर्जा, सरकारकडून ST महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

पाचवा दिवस

मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. कालपासूनच जरांगे यांची प्रकृती खालावली होती. यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांनी त्यांना उपचार घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील मनोज जरांगे यांना फोन करुन उपचार घेण्याची केली विनंती केली होती. जरांगे यांनी उपचार घेतले आहेत. मध्यरात्री पावणेदोन वाजता मनोज जरांगे यांना डॉक्टरांकडून सलाईन लावण्यात आले. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस होता.

अचानक खाली बसले

जरांगे पाटील यांना उपोषणाच्या चौथ्या दिवशी चालणं देखील मुश्कील झालं होतं. सहकाऱ्यांचा आधार घेत ते चालताना दिसत होते. मनोज जरांगे यांना थकवा जाणवतोय. ते स्टेजवरून खाली उतरताना अचानक खाली बसलेले पाहायला मिळाले. यावेळी त्यांना उठता येत नव्हते. दरम्यान, सरकारकडून मनोज जरांगेंना कोणता प्रतिसाद मिळतोय का? याकडं सर्वांचं लक्ष आहे. आजवर मराठा समाजाने सहकार्याचीच भूमिका घेतली आहे. एक वर्षापासून लढा सुरू आहे. लाखोंची जनता रस्त्यावर उतरल्याच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याच वाईट वाटायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया म्हणून जरांगे यांनी दिली होती. मनोज जरांगेंचे सध्या सहावे उपोषण सुरु आहे.

Assembly Elections 2024 : मविआचे जागा वाटप अंतिम ! काँग्रेस-ठाकरे प्रत्येकी शंभर जागा लढणार?

कोणत्या मागण्या

सगेसोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी.
हैदराबाद गॅझेट लागू करावे.
सातारा गॅझेट लागू करावे.
बॉम्बे गव्हर्नमेंट गॅझेट लागू करावे.
मराठा बांधवांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे सरसकट मागे घ्यावेत.

follow us