अखेर भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा दर्जा, सरकारकडून ST महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
Bharat Gogavale : गेल्या दोन-अडीच वर्षांपासून मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogavale) यांना मंत्रिपदाचा दर्जा मिळाला. गोगावले यांची राज्य परिवहन अर्थात एसटी महामंडळाचे (ST Corporation) अध्यक्षपदी नियक्ती करण्यात आली.
बीएसएफ जवानांची बस दरीत कोसळली; चार जवान शहीद, 28 हून अधिक जण जखमी
भरत गोगवाले हे दीर्घ काळापासून मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत होते. त्यांची एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदी वर्णी लागेल आणि रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळेल, अशी चर्चा होती. त्यांनी उघडपणे आपली इच्छा बोलूनही दाखवली होती. कोट शिवून तयार असल्याचं त्यांचं वाक्य अनेकदा चर्चेचा विषय ठरत असे. मात्र, विधानसभेचा कार्यकाळ संपत आला तरीही गोगवाले यांना मंत्रीपद मिळालं नव्हतं. अखेर आज राज्य सरकारने आज शासन निर्णय जारी करत गोगावले यांची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड केली.
Senate Election: आदित्य ठाकरेंना मोठा धक्का! मुंबई विद्यापीठाची पदवीधर सिनेट निवडणूक स्थगित
राज्यात महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकण्याच्या शिंदे गटात गोगावले हे आघाडीवर होते. त्यामुळं शिंदे यांच्या सरकारमध्ये भरत गोगवाले यांना मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा होती. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट, हेमंत पाटील, आनंदराव अडसूळ यांना विविध मंडळांवर नियुक्ती केलं होतं. मात्र, गोगावलेंना कुठलंचं महामंडळ मिळालं नव्हतं. त्यामुळं ते नाराज होते. मात्र, आज एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी भरत गोगवाले यांची नियुक्ती करण्यात आली. तसा शासन निर्णय जारी देखील सरकारकडून जारी करण्यात आला आहे
दरम्यान, गोगावले यांच्या निवडीमुळे एसटी महामंडळाला दहा वर्षांनंतर प्रथमच स्वतंत्र अध्यक्ष मिळणार आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीची घोषणा केव्हाही होऊ शकते. निवडणुकीपूर्वी हे पद मिळत असल्याने गोगावले हे पद स्वीकारतील का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
सध्या सत्तेत केवळ एकचा पक्षाच्या नेत्यांना महामंडळाचे वाटप होत असल्याने अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.