Download App

जरांगे मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम, आज सकाळी 10 वाजता मराठा बांधव अंतरवली सराटीहून निघणार

जरांगे आज (दि.27 ऑगस्ट) रोजी सकाळी 10 वाजता जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे मोर्चा घेऊन निघणार आहेत.

  • Written By: Last Updated:

Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange) नेतृत्त्वाखाली अंतरवाली सराटी ते मुंबई (Mumbai) मोर्चा काढला जाणार आहे. आज सकाळी जरांगे 10 वाजता अंतरवाली सराटीवरुन निघतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून (Devendra Fadnavis) मंगळवारी ओएसडी पाठवून जरांगेंनी गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत येऊ नये, अशी मनधरणी केली. मात्र, जरांगे 27 ऑगस्टलाच मोर्चा काढण्यावर ठाम आहेत.

सर्व भारतीयांचा DNA एकच, हिंदू राष्ट्राचा सत्तेशी काहीही संबंध नाही; सरसंघचालकांचे मोठे विधान 

जरांगेंची मागणी काय ?
जरांगे आज (दि.27 ऑगस्ट) रोजी सकाळी 10 वाजता जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे मोर्चा घेऊन निघणार आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी ते आमरण उपोषण करणार आहेत. तसंच मराठा-कुणबी एकच आहेत, याचा अध्यादेश लागू करा, सातारा, हैदराबाद आणि बॉम्बे गॅझेटियरची अंमलबजावणी करा, अशी त्यांची मागणी आहे.

न्यायालयाने परवानगी नाकारली, तरीही जरांगे कूच करणार?
मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने गणेशोत्सवामुळे आझाद मैदानावर आंदोलनास परवानगी नाकारली आहे. तरीही जरांगे मुंबईच जाण्यास ठाम आहेत. दरम्यान, हा मोर्चा आधी माळशेज घाट, कल्याणमार्गे मुंबईमध्ये धडकणार होता. पण मुंबईतील वाहतूक कोंडी वाढू शकते, त्यामुळे मोर्चाचा मार्ग बदलला आहे. जरांगे छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, खेड, चाकण, पुणे, लोणावळा, वाशी आणि चेंबूरमार्गे मुंबईत पोहोचतील.

येडपट-खुळचट जरांगेंचं आंदोलन सत्तेच्या खेळासाठी…; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल 

मुंबईत 100 टक्के जाणार
दरम्यान, लोकशाही मार्गाने आम्ही मुंबईत जाऊन उपोषण करू, संविधानाचे सगळे नियम पाळून आंदोलन करु, आम्ही मुंबईत 100 टक्के जाणार, न्यायदेवतेचं पालन करु, आमचे वकील बांधव कोर्टात जातील, न्यायदेवता न्याय देईल, असं जरांगे म्हणाले.

मोर्चाचा मार्ग कसा असणार?
27 ऑगस्ट रोजी ते सकाळी 10 वाजता मुंबईला रवाना होतील. नंतर ते जुन्नर येथे थांबतील. 28 ऑगस्ट रोजी ते शिवनेरी गडावर दर्शनासाठी जातील. दर्शनानंतर ते राजगुरू खेड मार्गे चाकणच्या दिशेनं जातील. चाकणहून जरांगे पाटील यांचा मोर्चा तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी मार्गे पुढे जाईल. 28 ऑगस्ट रोजी ते संध्याकाळी आझाद मैदानावर पोहोचतील.

जरांगे हा खुळचट अन् येडपट – हाके
जरांगे हा खुळचट अन् येडपट आहे. त्याला बोगस कुणबी नोंदी तयार करून ओबीसींच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करायची आहे, अशी टीका हाकेंनी केली. तसंच जरांगेंचं आंदोलन सत्तेच्या खेळासाठी सुरू आहे. जरांगे कोण लागून गेलाय? जरागेंना काय कळतं आरक्षणातलं? आरक्षण द्यायला तुझ्या बापाचा कायदा आहे का? आता तुम्हाला बोगस कुणबी नोंदी तयार करून ओबीसींच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करायची का?, असा सवाल हाकेंनी केला.

follow us