Download App

आरक्षणासाठी दोन समित्या करायची आवश्यकता होती का? शरद पवार स्पष्टच म्हणाले

Sharad Pawar On Reservation : राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरुन जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. 2 सप्टेंबर रोजी राज्य सरकारकडून

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar On Reservation : राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरुन जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. 2 सप्टेंबर रोजी राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासाठी जीआर जारी करण्यात आल्यानंतर राज्याचे मंत्री छगन भुजबळसह ओबीसी नेते लक्ष्मण हाके नाराज झाले असून सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहे. तर दुसरीकडे ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या हितासाठी राज्य सरकारकडून एक समिती स्थापन करण्यात आली आहे. तर आता या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर टीका केली आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आरक्षणासाठी या दोन समित्या करायची आवश्यकता होती का? असा सवाल शरद पवार यांनी राज्य सरकारला विचाराला आहे.

माध्यमांशी बोलताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, दोन समाजात कारण नसताना वातावरण वेगळ व्ह्यायला लागले आहे. आता दोन समित्या केल्या आहे मात्र या दोन समित्या करायची आवश्यकता होती का? एक एका जातीची आणि दुसऱ्या दुसरी जातीची याची आवश्यकता होती का? असा सवाल खासदार शरद पवार (Reservation) यांनी उपस्थित केला आहे. तसेच आमची भूमिका सामाजिक ऐक्य त्यात तडजोड करायचं नाही अशी आमची भूमिका आहे असं देखील माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले.

तो भाग महाराष्ट्रात नव्हता

तर दुसरीकडे माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी हैदराबाद गॅझेटवर (Hyderabad Gazette) देखील प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी शरद पवार म्हणाले की, गॅझेट या आधी मी वाचला नव्हता. त्यावेळी तो भाग महाराष्ट्रात नव्हता त्यामुळे त्यात त्याच्या खोलात आम्ही कधी गेलो नाही. प्रत्येत जातीची वेगळी मागणी असेल तर ऐक्य कसं निर्माण होईल? राजकारण न करता एकता कशी निर्माण होईल याची काळजी घेतली पाहिजे असेही यावेळी शरद पवार म्हणाले.

पेरलं कुणी, मशागत कुणाची अन् बजरंगबाप्पा आले कापणीला; बीड-अहिल्यानगर रेल्वेवरून पंकजा मुंडेंचा टोला

follow us