Maratha protestors on Matoshree Ambadas danve Chandrashekhar Bavankule : राज्यात गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू असलेला मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस आक्रमक होत आहे. यामध्ये आज मराठा आंदोलकांनी (Maratha protestors) थेट उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री ( Matoshree) या निवासस्थानाबाहेर मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून आंदोलन करण्यात आलं. या आंदोलकांनी ठाकरेंनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली. यावरून अंबादास दानवे (Ambadas danve) आणि चंद्रशेखर बावनकुळे आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं.
शेतकऱ्यांवर अन्याय , पुन्हा ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाचा आयोजन करा, अमर काळेंचं थेट मोदींना आव्हान
दरम्यान हे आंदोलकांना पोलिसांनी रोखल्याने हे आंदोलन आक्रमक झाले होते. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आंदोलकांची भेट घेतली. आरक्षणाला उद्धव ठाकरे आणि आपला पाठिंबा असल्याचे सांगितलं. मात्र आंदोलनकर्ते रमेश केरे पाटील हा भाजपचा माणूस असल्याचा आरोप दानवे यांनी केला.
अजितदादांचं वेशांतर, उद्धव ठाकरेंनी सुनावलंच; गृहमंत्र्यांनी राजीनामाच द्यावा…
तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावरून ठाकरे आणि दानवेंवर टीका केली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे हे आरक्षणाचे मारेकरी आहेत. त्यामुळे ते मराठा आंदोलकांना भेटत नाहीत. मात्र या आंदोलनानंतर मराठा मोर्चाचं शिष्टमंडळ उद्धव ठाकरे यांना भेटलं. अखेर मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीयं.
सर्वच खासदारांनी मोदींना भेटून तोडगा काढावा…
आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा वाढवण्याचा अधिकार राज्याला नसून लोकसभेला आहे, त्यामुळे सर्वच खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून मोदींनीच यावर तोडगा काढावा, अशी भूमिका ठाकरे यांनी मांडलीयं. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलकांनी भेट घेतली. सत्ताधारी सरकारने काही दिवसांपूर्वी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती, पण राज्य सरकारने राजकारण्यांना बोलवण्यापेक्षा सर्वच समाजातील नेत्यांना बोलावून यावर तोडगा काढला पाहिजे, मात्र एकमेकांमध्ये भांडणे लावून सत्ताधारी राजकीय पोळी भाजत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलायं.