Download App

Maratha Protest : जाळपोळ करणाऱ्यांवर 307 अंतर्गत गुन्हा दाखल करणार, फडणवीसांचा इशारा

Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन रान पेटलं आहे. एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे(Manoj Jarange Patil) उपोषणाला बसले आहेत. तर दुसरीकडे मराठा आंदोलकांकडून आमदार खासदारांचे घरे पेटवून दिल्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. जाळपोळ करणाऱ्यांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करणार असल्याचा कडक इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

Iphone : हेरगिरी अन् हॅकिंगपासून असं संरक्षण करा; आयफोनच्या ‘या’ फिचरबद्दल माहितीये का?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आरक्षण प्रश्नी राज्य सरकार सकारात्मक पाऊल उचलत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणासंबंधी शब्द दिला आहे. सरकार आरक्षणाबाबतीत कटीबद्ध असून जाळपोळ झाली त्याची दखल सरकार गांभीर्याने घेतं आहे. जाळपोळ प्रकरणातील दोषींवर कलम 307 अंतर्गत गुन्हे दाखल करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हंटले आहेत.

राज्यातील काही भागांत घरं जाळतानाचे व्हिडिओ समोर आले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संतप्त आंदोलक जाळपोळ करीत आहेत. काही ठिकाणी शांततापूर्ण आंदोलन सुरु आहे, शांततापूर्ण आंदोलन केल्यासं कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

Ahmednagar News: पाणीप्रश्न पेटणार! विरोध…आंदोलन…तरी नगरहून आज जायकवाडीला पाणी सोडणार

बीड जिल्ह्यात सकाळपासून आंदोलन आक्रमक झालेत. माजलगावचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश साळुंके यांच्या घराला आग लावण्या आली. त्यानंतर बीड शहरातही आमदार संदीप क्षीरसागर यांचे निवासस्थान व कार्यालयाला आग लावण्यात आली. बीड शहरात बंदोबस्त असतानाही आंदोलकर्त्यांना पोलिसांना चकवत आग लावली.

राजीनामा सत्र सुरूच! मराठा आरक्षणासाठी हेमंत गोडसेंनी दिला राजीनामा, शिंदे गटाला मोठा झटका

बीडच्या नगर परिषदेमध्येही जाळपोळ करण्यात आली. आरक्षणाची मागणी करणाऱ्या जमावाने माजलगाव नगरपरिषदेत घुसून जाळपोळ केली. अशा स्थितीत नगर परिषदेच्या इमारतीला भीषण आग लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. त्यामुळं सध्या माजलगाव परिसरात तणावाचे वातावरण आहे.

आता या हिंसक आंदोलनाचे लोन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही पोहोचले. गंगापूर शहरातील भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची मराठा आंदोलकांनी तोडफोड केली आहे. यावेळी कार्यालयातील सर्व सामानाची नासधूस करण्यात आली आहे. अचानक आलेल्या मराठा आंदोलकांनी बंब यांच्या कार्यालयाच्या काचा फुटल्या, खुर्च्याही फोडल्याचं समोर आलं होतं.

Tags

follow us