राज्यातील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पद्मश्री पोपटराव पवार यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. दरम्यान, सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वादंग पेटलं आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरु आहे, तर दुसरीकडे मराठा आंदोलकांनी राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेशबंदी केली आहे. या परिस्थितीवर भाष्य करणारं पत्र पद्मश्री पोपटराव पवार यांनी फडणवीसांना पाठवलं आहे.
Vikramaditya Motwa: फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिळालेल्या प्रतिसादाबद्दल अभिनेत्याने व्यक्त केल्या भावना
पोपटराव पवार पत्रात म्हटले, “कार्यकारी सेवा सहकारी संस्था व ग्रामपंचायत यावर होत असून परिणामी ग्रामविकासाच्या योजनावर निधी असून आपसी मतभेदांमुळे कामे पूर्ण होत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली. यामुळे भविष्यकाळात सामाजीक जीवनामध्ये याचा दूरगामी परिणाम होणार आहे.मतपेटी भोवती फिरणारी निर्णय प्रक्रिया वेळीच थांबली नाहीतर येणाऱ्या काळात याची फार मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचं ते म्हणाले आहेत.
‘कधी ग्रामपंचायत लढवली नाही अन् आता..,’; प्रकाश सोळंके ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय म्हटले?
तसेच “कुठेतरी समाज आणि राष्ट्रहितासाठी कटू निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे आणि कोणालातरी याची किंमत मोजावी लागणार आहे हे निश्चित आहे. तरी आपण सर्व समाजातील धुरिणांना एकत्र बोलावून सत्ताधारी व विरोधक एकत्र येत सर्वसमावेशक त्वरित निर्णय घेण्याची गरज आहे.आपले प्रयत्न सुरूच आहेत परंतु फारकाळ हे प्रश्न भिजवत ठेवून चालणार नाही.
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमापूर्वी यवतमाळमध्ये राडा; मराठा आरक्षण आंदोलकांची आक्रमक निदर्शने
कारण सध्याची विविध समाजामधील तणावाची परिस्थिती आर्थिक गरजेपोटी उद्भवली आहे परंतु उशीर झाल्यास विविध समाजांमध्ये वैचारिक व भावनिक विरोध निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. एकीकडे ज्या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्र उभा केला त्या राज्यकर्त्यांनाच गावात प्रवेश मिळत नाही हि परिस्थिती अतिशय खेदजनक आहे असे मला वाटते.”
मराठवाड्यात आंदोलन पेटलं; जालना तहसिलदारांची गाडी फोडली, चार जिल्ह्यात एसटी बंद
दरम्यान, राज्याला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा असून त्यांनी समाज संघटीत ठेवला आहे तो असाच संघटीत राहावा. या अपेक्षेसह वरील सर्व बाबींचा आपण सहानुभूतीपुर्वक तातडीने विचार करावा, असे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते, परिस्थिती पाहता मला बोलावेसे वाटले, असल्याचंही पवार यांनी लिहिलं आहे.