Download App

Maratha Reservation संदर्भात खासदार विखेंनी केली स्पष्ट भूमिका, म्हणाले…

  • Written By: Last Updated:

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation ) मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार सुजय विखे यांना सकल मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. सकल मराठा समाज बाधवांना ओबीसी मधून सरसकट आरक्षण मिळावे हा मुद्दा लोकसभेत मांडून आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी याबाबत विखेंना निवेदन देण्यात आले. आमचं समर्थन प्रत्येक वेळी सकल मराठा समाजाच्या बाजूने राहिले असून मराठा बांधवांच्या पाठीमागे आम्ही सदैव खंबीरपणे उभे आहोत, असं यावेळी खासदार सुजय विखे म्हणाले.

Jacky Shroff ला चाहत्यांचा ह्रदयाचा ‘हिरो’ बनवणाऱ्या ‘हिरो’ ला 40 वर्ष पूर्ण

शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव येथे साखर वाटपाच्या कार्यक्रमास खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे आले होते. याच दरम्यान सकल मराठा समाज, बोधेगाव यांनी त्यांची भेट घेऊन खासदार विखें यांना मराठा आरक्षणाबाबत निवेदन दिले. खासदार विखे यांनी देखील निवेदन स्वीकारून सकारात्मक संवाद साधला.

Bulldozer Action in MP : यूपीनंतर आता मध्य प्रदेशमध्ये बुलडोझरची ‘दहशत’…

यावेळी मराठा आरक्षणावर भाष्य करताना विखे म्हणाले, मराठा आरक्षणाच्या संदर्भात यापूर्वीही नामदार राधाकृष्ण विखे पाटील व मी सकारात्मक भूमिका मांडली आहे. आमचं समर्थन प्रत्येक वेळी सकल मराठा समाजाच्या बाजूने राहिले असून मराठा बांधवांच्या पाठीमागे आम्ही सदैव खंबीरपणे उभे आहोत.

मंत्री विखे पाटील यांनी व खासदार म्हणून मी यापूर्वीही मराठा समाजाची भूमिका स्पष्ट मांडली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरच मराठा आरक्षणावर योग्य तो तोडगा काढण्यात येईल असे मत त्यांनी व्यक्त केले.

follow us