A cruel couple tortured and killed girl sillod incident: राज्य गेल्या काही दिवसांपासून क्रूर हत्याने गाजत आहे. प्रेम प्रकरणातून होणाऱ्या हत्या, वादातून पत्नीच्या, पतीच्या हत्याच्या बातम्या राज्यात कुठेना कुठे घडत असतात. त्यात आता लहान मुलेही सुरक्षित नाहीत. दत्तक कन्या म्हणून घरी आणलेल्या चिमुरडीचा सांभाळ न करता तिला मृत्यूचा दारात ढकल्याची घटना संभाजीनगर (Chatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील सिल्लोड ( Sillod) तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी फौजिया व फईम शेख या पती-पत्नीला पोलिसांनी अटक केलीय.
धनंजय मुंडेंशी आश्रमातील ती भेट ते लग्नाआधीच गरोदर; करूणा मुंडेंनी सांगितली सर्व इत्थंभूत हकीकत…
सिल्लोड तालुक्यातील मोगलपुरा भागात राहणाऱ्या फईम आणि फौजिया फईम शेख या दाम्पत्याने आयत नावाच्या मुलीला दत्तक घेतले होते. आयत या चिमुकलीला घरी आणल्यानंतर हे दाम्पत्य तिचा अनन्वित छळ करत होते. या क्रूर पती-पत्नीकडून चिमुरडीला चटके दिले जात होते. जळत्या लाकडाने ते तिच्या शरीरावर चटके देत होते. एवढेच नाही तर क्रूरकर्मा फईम आणि फौजियाने तिचे हात-पाय पिरगळून मोडले होते. तिला डोक्यात आणि पाठीवर बेदम मारहाण केली होती. अमानुष मारहाणीमुळे चिमुरडी जीवाच्या आकांताने ओरडत होती, मात्र या पती-पत्नीला तिची दया आली नाही. 15 दिवसांची उपासमार आणि अमानुष अत्याचारामुळे चिमुरडीचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूनंतर कोणालाही याची कानोकान खबर लागू नये आणि आपले पितळ उघडे पडू नये यासाठी फईम आणि फौजिया यांनी गुपचूप तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला.
वाघ्या कुत्र्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली ठाम भूमिका; म्हणाले, उगाच दोन समाज…
चार वर्षांच्या चिमुरडीचा छळ करुन तिचा खून केल्यानंतर फौजिया आणि फईम शेख हे सिल्लोड येथील कब्रस्तानमध्ये तिचा मृतदेह घेऊन गेले. कोणालाही काही न सांगता दफनविधी करण्याची त्यांची तयारी होती, मात्र या मध्ये काहीतरी संशयास्पद असल्याचे लक्षात आल्यानंतर शेजारी असलेल्या लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस कब्रस्तानमध्ये पोहोचले आणि त्यांनी दफनविधी रोखला. चिमुरड्या आयत शेखचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. यामध्ये चिमुरडीला हालहाल करुन मारण्यात आल्याचे उघड झाले. सिल्लोड शहर पोलिसांनी फौजिया आणि फईम शेख या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक मयंक माधव यांनी दिली.
मुलीला दत्तक घेतल्याचा बनाव ?
या मुलीला या दाम्पत्याने दत्तक घेण्याचा बनाव केला असावा, असा संशय पोलिसांना आहे. या मुलीला विकत घेऊन तिला दुसऱ्याला विकायचे होते की तिला भीक मागायला लावायचे होते, या बाजूने पोलिस तपास करत आहेत.