धनंजय मुंडेंशी आश्रमातील ती भेट ते लग्नाआधीच गरोदर; करूणा मुंडेंनी सांगितली सर्व इत्थंभूत हकीकत…

धनंजय मुंडेंशी आश्रमातील ती भेट ते लग्नाआधीच गरोदर; करूणा मुंडेंनी सांगितली सर्व इत्थंभूत हकीकत…

Dhananjay Munde Karuna Munde meeting in ashram to getting pregnant before marriage : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री आणि परळीचे आमदारह धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांना दर महिन्याला २ लाखांची पोटगी देण्याच्या वांद्रे सत्र न्यायालयाच्या अंतरिम आदेशावरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज अंतिम सुनावणी झाली. यावेळी धनंजय मुंडेंनी मी मुलांना स्वीकारत आहे, पण मी त्यांच्या आईशी लग्न केलं नाही, असा युक्तीवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केला. मात्र त्यांची लव्ह स्टोरी नेमकी कशी सुरू झाली हे आपल्या मुलाखतीत करूणा यांनी सांगितलं. पाहुयात त्या काय म्हणाल्या?

‘चिरायू’ २०२५’ सोहळ्याचा जल्लोष; मकरंद अनासपुरेंचा ‘पर्यावरण स्नेही’ पुरस्काराने सन्मान

1998 साली माझी धनंजय मुंडे यांच्यासोबत मध्यप्रदेशच्या इंदोरमधील भय्यूजी महाराज या महंतांच्या आश्रमामध्ये पहिल्यांदा भेट झाली होती. त्यावेळी मी माझ्या आईसोबत या आश्रमात गेले होते. त्याचवेळी आश्रमामध्ये गोपीनाथ मुंडे, धनंजय मुंडे त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर काही नेते. या आश्रमाला नेहमी भेट देत होते अशाच एका दिवशी मी तिथे गेली असताना धनंजय मुंडे आणि मी अपघाताने भेटलो. आमची धडक झाली होती.आमचं लग्नही इंदोरमध्येच झालं. त्यानंतर आम्ही मुंबईत आलो.

वाघ्या कुत्र्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली ठाम भूमिका; म्हणाले, उगाच दोन समाज…

तिथे आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. त्याचवेळी धनंजय मुंडेंचं कायद्याचे शिक्षण सुरू होतं. त्यामुळे त्यांनी माझं देखील शिक्षण सुरू केलं होतं. तसेच ही गोष्ट गोपीनाथ मुंडे यांना देखील माहिती होती. मी ब्राह्मण समाजाची असल्याने मुंडेंच्या घरच्यांना तसेच माझ्या आईला देखील आमचं लग्न मान्य नव्हतं. त्यामुळे आम्ही पळून जाऊन लग्न केलं. एकदा माझं लग्न होता होता मोडलं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा मी पूर्ण नवरीचा साजशृंगार करून लग्नासाठी उभे होते. तेव्हा मी गरोदर होते. असा सगळा प्रवास एका वाहिनीला मुलाखत देताना.

अधिकृत लग्न केलंच नाही

करुणा मुंडे यांना पोटगी मिळण्याप्रकरणी अंतिम युक्तीवाद सुरु आहे. आता धनंजय मुंडे यांच्या बाजूने वकिलांनी कोर्टात युक्तीवाद केला. धनंजय मुंडेंनी मी मुलांना स्वीकारत आहे, पण मी त्यांच्या आईशी लग्न केलं नाही, असा युक्तीवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केला. यावेळी धनंजय मुंडेंच्या वकिलांनी धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांच्याशी अधिकृत लग्न केलंच नाही, असा दावाही केला.

धनंजय मुंडे सहाच महिन्यांत आमदारकीचा राजीनामा देणार, करुणा मुंडेंच्या दाव्याने खळबळ

राजश्री मुंडे या धनंजय मुंडे यांच्या खऱ्या पत्नी आहेत. मी मुलांना स्वीकारत आहे. मात्र, मी त्यांच्या आईशी लग्न केलं नाही. धनंजय मुंडे यांचे करुणा मुंडेंसोबत अधिकृत लग्न झालेले नाही. धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांच्याशी अधिकृत लग्न केलंच नाही. करुणा मुंडे यांना १५ लाखाच्या जवळपास वर्षाला इन्कम आहे, त्या इन्कम टॅक्स भरतात.

माझ्या पैशांची गरज नाही

करुणा मुंडे आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत. तरी त्यांनी पोटगीसाठी अर्ज केला आहे, असा युक्तीवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केला. करुणा मुंडे यांचे स्वतःचे व्यवसाय आहेत. त्यांना माझ्या पैशांची गरज नाही. त्या स्वतः स्वतःचा खर्च मॅनेज करत आहेत. सातत्याने करुणा माझ्यावर वेगवेगळे आरोप करत आहे. करुणा मुंडे या आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत, असेही धनंजय मुंडेंच्या वकिलांनी कोर्टात सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube