Chatrapati Sambhajinagar : वडील ओरडले म्हणून तिने घरच लुटले

Chatrapati Sambhajinagar : वडील ओरडले म्हणून तिने घरच लुटले

Chatrapati Sambhajinagar News : मुलांचा व पालकांचा संवाद दुरावत चालल्याने अनेकदा मुलं टोकाचे पाऊल उचलतात किंवा वेगळे पाऊल उचलतात. दरम्यान अशीच काहीशी धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. पालकांशी पटत नसल्याने एका चौदा वर्षीय मुलीने थेट घरच सोडले. एवढ्यावरच न थांबता या अल्पवयीन मुलीने घरातील सोने, पैसे, आदी वस्तू घेऊन थेट रेल्वेस्टेशन गाठले. मात्र प्लॅटफॉर्मवरील एका विक्रेत्याला याचा संशय आल्याने त्याने तातडीने संबंधित मुलींबाबत पोलिसांना कळवले व तिला ताब्यात घेण्यात आले. दामिनी पथकाने मुलीला ताब्यात घेऊन बालसुधारक गृहात तिची रवानगी केली.

याबाबत अधिक माहिती अशी, छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणारी या मुलीचे वडील हे पुजारी आहे. आपली मुलगी उशिरा रात्रीपर्यंत बाहेर असते. आपल्याला काही सांगत नाही यामुळे संबंधित मुलीचे वडील तिच्यावर ओरडले होते. याच राग मुलीने मनात धरून ठेवला होता.

कुटुंबाशी पटत नसल्याचं कारण सांगत ती घरातून निघून गेली. तिने घरातून बाहेर पडताना सोबत घरातील सर्व पैसे आणि दागिनेही सोबत घेतले. मुलगी घरातील सोनं पैसे घेऊन आसामला जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर पोहोचली होती. तिचे कॉलवर बोलणे चालू होते.

दरम्यान, ही बाब रेल्वे स्थानकावरील पाणीविक्रेत्यांच्या लक्षात आली. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. दामिनी पथकाने मुलीला ताब्यात घेऊन बालसुधारक गृहात तिची रवानगी केली. छत्रपती संभाजीनगर शहरात राहणारी ही अल्पवयीन मुलगी कुटुंबीयांसोबत राहते. शहरातील इंग्रजी शाळेत सातव्या वर्गात शिक्षण घेते.

RBI dividends : मोदी सरकारचे अच्छे दिन! केंद्र सरकारला आरबीआयकडून मिळणार ‘एवढी’ रक्कम

वडिलांसोबत जाण्यास नकार
संबंधित मुलीचे आपल्या वडिलांशी पटत नसल्याचे समोर आले आहे. यामुळेच तिने असे पाऊल उचलले असल्याचे समजते. दरम्यान रेल्वे स्टेशनवरून तिला ताब्यात घेत तिचे समुपदेशन केले. परंतु, ती वडिलांसोबत जाण्यास तयार झाली नाही. अखेर, बाल कल्याण समितीच्या आदेशाने तिला बालगृहात ठेवण्यात आल्याची माहिती आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube