Download App

बीडमधील आष्टी तालुक्यातील धक्कादायक घटना; नवजात बाळ घरातच सोडलं अन्….

बीड तालुक्यातील खळबळजनक बातमी समोर आली आहे. चार दिवसांपूर्वी पतीने जीवन संपवल्यावर पत्नीचा टोकाचा निर्णय....

  • Written By: Last Updated:

Beed News : बीडमधील आष्टी तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (Beed News) पतीच्या निधनाचा विरह सहन न झाल्याने एका २२ वर्षीय विवाहितेने तान्ह्या बाळाला घरी सोडून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना आष्टी तालुक्यातील खिळद येथे घडली आहे. स्वाती नंदू नागरगोजे-गर्जे असं आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

पाटोदा तालुक्यामध्ये घुगेवाडी गावच्या नंदू नागरगोजे यांचा काही महिन्यांपूर्वी खिळद (ता. आष्टी) येथील स्वाती गर्जे यांच्यासोबत विवाह झाला होता. लग्न झाल्यावर दोघे पुण्यातील शेवाळवाडीमध्ये राहायला गेले होते. स्वाती आणि दोघे पुण्यामध्येच राहत होते, स्वाती गर्भवती असल्याने ती तिच्या माहेरी तीन महिन्यांपूर्वी खिळद येथे गेली होती.

बीड जिल्ह्यात गुंडाराज कायम; पाटोदा तालुक्यात कंत्राटदाराला बेदम मारहाण, काय आहे प्रकरण?

पुण्यात नंदू याने राहत्या स्वत:ला गळफास लावत आपलं जीवन संपवलं. त्यामुळे स्वातीला मोठा धक्का बसला. गावी नंदूवर अंत्यविधी करण्यात आला. स्वाती या अंत्यविधी आणि सावडण्यासाठी आली होती. सर्व कार्यक्रम आटोपल्यावर आपल्या घरच्यांसह ती माहेरी परतली. पण ती पतीच्या जाण्याच्या धक्क्यातून सावरली नाही.

बुधवारी सकाळी सर्व घरी परतले. मात्र, पहाटे तिने स्वतःच्या नवजात तान्ह्या बाळाला घरी सोडलं. त्यानंतर बाजूच्या विहिरीमध्ये उडी घेत आपलं जीवन संपवलं. या घटनेची माहिती मिळताच अंभोरा स्टेशनचे पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले. मयत स्वाती नंदू नागरगोजे-गर्जे यांच्या मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह बाहेर काढला.

follow us