मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही; छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणाची आत्महत्या

मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही; छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणाची आत्महत्या

Suicide in Chhatrapati Sambhajinagar : माझ्यामुळे झालेल्या त्रासाबद्दल सॉरी अशी नोट लिहून २७ वर्षीय युवकाने गळफास घेत आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. ही घटना उस्मानपुरा भागातील एकदंत (Sambhajinagar) अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये घडली आहे. मृत युवकाचे नाव दीपेश राजू तनवाणी (वय 27 रा. गुलमंडी, ह. मु. एकदंत सोसायटी, चौथा मजला) असं आहे.

छत्रपती संभाजीनगर हादरलं; सराईत गुन्हेगाराचा मैत्रिणीवर गोळीबार, म्हणाला आणखी गोळीबार होणार

दीपेशने गळफास घेतलेल्या फ्लॅटमध्ये पोलिसांना एक नोट आढळली. इंग्रजीत लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. परिवारांतील सर्व जण काळजी घ्या, असं लिहिलं होतं, असं पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी सांगितलं. दीपेश माजी नगरसेवक राजू तनवाणी यांचा मुलगा होता. तो काही दिवसांपासून तणावात असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

एकदंत अपार्टमेंटमधील राजू तनवाणी यांच्या मालकीच्या फ्लॅटमध्ये दीपेश थांबला होता. आईशी फोनवरून संवाद साधून त्याने ही माहिती दिल्याचे निकटवर्तीयांनी सांगितलं. रात्री आठ वाजता संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क झाला नाही. त्यामुळे नातेवाइक एकदंत अपार्टमेंट येथे गेले. त्या वेळी दीपेशने आत्महत्या केल्याचं समोर आलं. या प्रकाराची माहिती तनवाणी कुटुंबीयांसह पोलिसांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्यासह उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या