बीड जिल्ह्यात ‘गुंडा’राज कायम; पाटोदा तालुक्यात कंत्राटदाराला बेदम मारहाण, काय आहे प्रकरण?

बीड जिल्ह्यात ‘गुंडा’राज कायम; पाटोदा तालुक्यात कंत्राटदाराला बेदम मारहाण, काय आहे प्रकरण?

Beed Crime : संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यामध्ये कायदा (Beed) आणि सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत असल्याचं पाहायला मिळत आहे. बीडमध्ये मारहाण, हाणामारीचे प्रकार सुरु आहेत. आता बीडच्या पाटोदा तालुक्यात कंत्राटदाराला मारहाण झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणामुळे परिसरामध्ये पुन्हा एकाद दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

कंत्राटदाराला ५० हजार रुपये दे नाहीतर काम बंद कर अशी धमकी देत अमानुष मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर पीडित कंत्राटदार सलीम जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी कंत्राटदाराचा जवाब नोंदवून घेतला आहे. या घटनेला दीड महिना पूर्ण झाला असला तरीही गुन्हा दाखल करण्यात आला नसून आरोपी अद्यापही मोकाट आहेत, असं पीडित व्यक्तीने म्हटलं आहे.

कबुतरखाना विषय वादाचा नाही, समाजाचा आहे; मु्ख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट

पीडित कंत्राटदार शेख मुजम्मिल यांच्या अंगावर गंभीर स्वरुपाच्या जखमा आहेत, मला जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण झाली आहे. घटना घडून तब्बल दीड महिना होऊनही न्याय मिळत नसल्याने मी नैराश्यात गेलो आहे. माझ्या जीवाचं बरं वाईट होईल, माझ्या जीवाला या लोकांकडून धोका आहे, मला तात्काळ न्याय द्यावा अशी मागणी कंत्राटदाराने पोलीस अधीक्षकांकडं केली आहे.

शेख मुजम्मिल यांनी आज (१३ ऑगस्ट) सर्व पुरावे आणि मारहाणीचे फोटो बीडच्या पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे सुपूर्त केले आहेत. मला न्याय मिळावा असं निवेदन पीडित व्यक्तीने केलं आहे. कुठल्या राजकीय पक्षाचा किंवा नेत्याचा पोलिसांवर दबाव आहे, या दबावापोटी माझा गुन्हा ते दाखल करुन घेत नाहीत, अशी प्रतिक्रिया शेख मुजम्मिल यांनी दिली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube