Ajit Pawar Criticize Bajrang Sonavane in Beed : लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) आणि उदयनराजे भोसले यांनी बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुती आणि भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. त्यावेळी त्यांनी त्यामुळे मी सर्व काही देऊन जो मला सोडू शकतो. तो जनतेलाही सोडू शकतो. असं म्हणत शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणेंही ( Bajrang Sonavane ) दम भरला.
Pakistan : पाकिस्तान सरकारला धक्का! जुन्या मित्राने नाकारली मोठी ऑफर?
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, आमच्या पंकजाताईंच्या विरोधात बजरंगा उभा आहे. तो सारखा माझ्याकडे यायचा आणि म्हणायचा दादा माझ्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढवा. ती कॅपॅसिटी मी वाढवून देत नव्हतो. मात्र धनंजय मुंडेंनी ते वाढवून द्यायला लावली. मी सांगितलं होतं काही गोष्टींची वेसन हातात ठेवावी लागते. कारण मी राजकारणात 35 वर्ष घासली आहे.
केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत ‘या’ पदांसाठी भरती सुरू, महिन्याला ३० हजार रुपये पगार
मला माहिती होतं. पण कधी कधी आमच्या धनु भाऊला माणसंच कळत नाही. त्यामुळे गाडी बिघडते. त्यामुळे तुम्ही माझा सल्ला घेत जा. तर हाच बजरंगा म्हणायचा छाती फाडली की, हे दिसेल ते दिसेल. पण छाती फाडली की मरून जाशील कोण दिसेल? हनुमानाने छाती फाडलेली वेगळी. तसेच बार्शी आणि बीडमध्ये त्याचे कारखाने चालू होते. मात्र त्याला काय अवदसा आठवली काय माहिती. पण एकदा पराभूत झालेला असतानाही पुन्हा एकदा उभा राहिला. कारण पैसा आल्यानंतर मस्ती येतेच. त्यामुळे इतके दिवस माझ्याबरोबर राहिला. आता मला सोडलं. त्यामुळे मी सर्व काही देऊन जो मला सोडू शकतो. तो जनतेलाही सोडू शकतो. हा पठ्ठ्या स्वतःही पडणार आणि मुलीलाही ग्रामपंचायत आणि नगरपालिकेत निवडून आणता येईना.