केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत ‘या’ पदांसाठी भरती सुरू, महिन्याला ३० हजार रुपये पगार

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत ‘या’ पदांसाठी भरती सुरू, महिन्याला ३० हजार रुपये पगार

ICAR-CIRCOT Mumbai Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या (Govt job ) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, नुकतीच केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेने (ICAR-CIRCOT) काही रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ईमेलद्वारे अर्ज पाठवावेत. या पदांसाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखतीही आयोजित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या भरतीसाठी मुलाखतीची तारीख, भरतीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊया.

Ruchira Jadhav : ‘बिग बॉस मराठी’ फेम रुचिराच्या नखरेल अदा 

तुम्हालाही या पदांसाठी अर्ज करायचा असल्यास, तुम्ही https://circot.icar.gov.in/ या अधिकृत वेबसाइटलाही भेट देऊ शकता. या पदभरतीसाठी अर्ज करतांना उमेदवारांनी अचूक माहिती भरावी. चुकीचा अर्ज भरल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.

रिक्त जागा आणि पदांची संख्या –
या पदभरती अंतर्गत यंग प्रोफेशनल I (YP) पदाच्या जागा भरल्या जाणार आहे. एकूण दोन जागांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित केली आहे.

शैक्षणिक पात्रता – अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे टेक्सटाईल टेक्नॉलॉजी/टेक्सटाईल केमिस्ट्रीमधील डिप्लोमा/पदवी असणे आवश्यक आहे.

Video : पंचाहत्तरी पूर्ण करताच मोदी मोठा गेम करणार; शाहंचं नाव घेत केजरीवालांचा दावा 

वयोमर्यादा –
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 45 वर्षांच्या दरम्यान असावे.

पगार-
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ३० हजार रुपये पगार मिळेल.

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अधिसूचना-
https://circot.icar.gov.in/sites/default/files/Advertisement%2007.05.2024.pdfो

अर्ज कसा करायचा?
अर्ज भरल्यानंतर, तो PDF फॉरमॅटमध्ये 22 मे 2024 च्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर्व संबंधित कागदपत्रांसह senthilcricrot@gmail.com वर ईमेलद्वारे पाठवावा. तसेच, अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड 27 मे रोजी मुलाखतीद्वारे केली जाईल. मुलाखतीच्या वेळी उमेदरवारांनी आपले सर्व कागदपत्रे सादर करणं आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता
उमेदवारांना “ICAR-CIRCOT, अडेनवाला रोड, पाच गार्डन्सजवळ, माटुंगा, मुंबई – ४०००१ या पत्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल.

या पदभरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या मुदतीतच अर्ज करावा. कारण, उशीरा आलेले अर्ज नाकारले जातील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube