बीड : मस्साजोगचे संरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येनंतर बीड चांगलचं चर्चेत आलेले असतानाच आता बीडचे नवनियुक्त पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत (Navneet Kanwat) यांनी बीड पोलीस विभागाला मोठे आदेश दिले आहेत. ज्यात त्यांनी बीड पोलीस विभागात अडनावाऐवजी फक्त नावाचा उल्लेख करावा असे म्हटले आहे. बीडमधील जातीय वाद दूर करण्यासाठी कॉवत यांचे हे आदेश महत्त्वाचे मानले जात आहेत.
बीडमध्ये नवीन सिंघम, सरपंच हत्या प्रकरणाचा तपास करणारे नवनीत कॉवत कोण?
कॉवत यांचे आदेश नक्की काय?
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गेल्या काही दिवसांपासूनबीड जिल्ह्यात जातीय तणाव, मराठा विरुद्ध वंजारी असा संघर्ष सातत्याने होताना दिसत आहे. हा संघर्ष दूर करण्यासाठी आता बीडचे नवनियुक्त पोलीस अधिकक्ष यांनी बीड पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना एकमेकांना पहिल्या नावाने हाक मारणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचे आदेशही जारी करण्यात आले आहेत.
जारी करण्यात आलेल्या आदेशात कॉवेत यांनी म्हटले आहे की, अडनावातून जात, धर्म ओळखता येत असेल तर, ही ओळख हळूहळू पुसावी लागेल. आपण असे वागलो तर, समाजही अनुकरण करेल. असे कॉवत यांनी म्हटले आहे. पोलिस खात्यात एकाच जातीचे कर्मचारी असून ते आरोपींना सहकार्य करत असल्याचाही आरोप झाला. त्यामुळे जातीय भेदभाव नष्ट करण्यासाठी हा आदेश लागू केला आहे.
एसआयटीमध्ये वाल्मिक कराडचेच पोलीस
सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीमध्ये वाल्मिक कराडच्या जवळचे पोलीस अधिकारी असल्याचा खळबळजनक शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला होता. याबातचे फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर एसआयटीतील काही तपास अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर आता कॉवत यांनी जातीयवाद दूर करण्यासाठी बीड पोलीस दलातील सर्व कर्मचाऱ्यांना एकमेकांना फक्त पहिल्या नावाने हाक मारण्याचे आदेश दिले आहेत. कॉवत यांच्या या आदेशाचे आता काय पडसाद उमटतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.