मृत्युनंतरही दुसऱ्यांच्या उपयोगी यावा देह; बीडच्या गोदावरीबाईंचा प्रेरणादायी निर्णय

Body Donation : बीडच्या घाटनांदुर येथील गोदावरीबाई जाधव यांच्या निधनानंतर कुटुंबीयांनी त्यांची इच्छा पुर्ण करत देहदान केलं.

News Photo   2026 10 06T172315.778

Body Donation

Body Donation : घाटनांदुर येथील गोदावरीबाई दगडु जाधव (Beed) यांचं वयाच्या 74 व्या वर्षी निधन झालं. मात्र मृत्युनंतरही आपला देह दुसऱ्यांच्या उपयोगी यावा, अशी त्यांची इच्छा होती. कुटुंबीयांनी त्यांच्या या इच्छेचा मान ठेवत अंत्यसंस्काराऐवजी देहदानाचा निर्णय घेतला. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मानवी शरीररचनेचा अभ्यास करता यावा, यासाठी त्यांचा देह वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपुर्द करण्यात आला.

गोदावरीबाईंच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मात्र त्यांनी हयातीतच देहदानाची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे दुःखाच्या प्रसंगातही कुटुंबीयांनी त्यांचा निर्णय मान्य करत देहदानाची प्रक्रिया पुर्ण केली. त्यांच्या देहाचा अभ्यास करुन भविष्यात अनेक रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर तयार व्हावेत, हा त्यांच्या निर्णयामागचा मुख्य हेतू होता.

रणजीच्या मैदानात बीडचा जलवा; महाराष्ट्राच्या संघात जिल्ह्यातील 3 खेळाडुंची निवड

ग्रामीण भागात आजही देहदानाबाबत पुरेशी जनजागृती झालेली नाही. देहदानाबाबत अनेकांच्या मनात गैरसमज आणि भीती असते. अशा परिस्थितीत गोदावरीबाई यांनी घेतलेला निर्णय आणि कुटुंबीयांनी त्याला दिलेली साथ महत्वाची ठरली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे गावाकडील नागरिकांमध्येही देहदानाबाबत जागृती होण्यास मदत होणार आहे.

कुटुंबीयांनी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीररचना विभागाशी संपर्क साधल्यानंतर गोदावरीबाईंचा देह वैद्यकीय शिक्षणासाठी महाविद्यालयाकडे सुपुर्द केला. वैद्यकीय विद्यार्थ्यांना मानवी शरीराची रचना समजुन घेण्यासाठी देहदानातून मोठी मदत मिळते. त्यामुळे गोदावरीबाईंनी घेतलेला निर्णय त्यांच्या निधनानंतरही वैद्यकीय शिक्षणासाठी योगदान देणारा ठरणार आहे.

Exit mobile version