Download App

चंद्रशेखर रावांनी पेरलेलं उगवलं! BRS ला महाराष्ट्रात मिळालं पहिलं यश

Winning candidate of BRS : बीआरएस पक्षाला महाराष्ट्रात पहिलं यश मिळालं आहे. औरंगाबादमधील गंगापूरच्या आंबेलोहळ गावातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत बीआरएसच्या उमेदवारांने खात उघडलं आहे. गफार सरदार पठाण असं या उमेदवाराचं नाव असून पठाण यांचा पोटनिवडणुकीत दणदणीत विजय झाला आहे.

Video : आव्हाडांनाही पडली भुरळ; काँग्रेस नेत्याच्या पक्षनिष्ठेचे केले तोंडभरून कौतुक..

गेल्या काही दिवसांपासून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेत रणशिंग फुंकले होते. या सभेतच आगामी काळात बीआरएस महाराष्ट्रातही सर्वच निवडणुका लढवणार असल्याचं घोषित केलं होतं. त्यानूसार आंबेलोहळ गावात झालेल्या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत बीआरएस पक्षाचे उमेदवार रिंगणात होते.

गौतमी पाटील कॉन्ट्रॉव्हर्सी क्वीन; पुण्यातील कार्यक्रमानंतर काय होतोय आरोप?

काल झालेल्या या पोटनिवडणुकीचा निकाल आज घोषित झाला असून या पोटनिवडणुकीत गफार सरदार पठाण भरघोस मतांनी निवडून आले आहेत. गफार पठाण यांच्या विजयानंतर पठाण हे बीआरएस पक्षाचे राज्यातील पहिले विजयी उमेदवार ठरले आहेत.

काँग्रेसला देशाच्या विकासाचं काही घेणं देणं नाही…नड्डांचा हल्लाबोल

मागील काही दिवसांपूर्वीच के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या नाव बदललं होतं. याआधी त्यांच्या पक्षाची ओळख ‘तेलुगू देशम पक्ष’ अशी होती आता ‘बीआरएस’ असं नामकरण करण्यात आलं आहे. पक्षाचं नाव बदलल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय राजकारणाकडे लक्ष केंद्रित केलं आहे. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी नांदेडमध्ये पहिली सभा घेतली. त्यानंतर त्यांनी मराठवाड्यातही सभा घेतली.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर नांदेडमध्ये करण्यात आली आहे. नांदेडच्या अनंता लॉन्स येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 19 ते 20 मेदरम्यान होणाऱ्या या शिबीरासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हेदेखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

Tags

follow us