Mla Suresh Dhas : पोलिसांसमोर हजर व्हायचं की नाही, यावरुन वाल्मिक कराड आणि त्यांच्या आकांमध्ये द्वंदयुद्ध सुरु असल्याचा नवा बॉम्ब भाजपचे आमदार सुरेश धस (Mla Suresh Dhas) यांनी फोडलायं. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुरेश धस यांच्याकडून अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर करण्यात येत आहेत. या प्रकरणी आमदार धस यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधलायं.
देशमुख प्रकरणावरून अंजली दामानियांचा रामदास आठवलेंसमोर तीव्र निषेध, म्हणाल्या ही माणूसकी..
आमदार सुरेश धस पुढे बोलताना म्हणाले, वाल्मिक कराडच्या अटकेच्या मुद्द्यावरुन आज सकाळीच माझ्याकडे काही माध्यमांची प्रतिनिधी आले होते. त्यावेळी मी सांगितलं की मी सर्वच माध्यमांच्या समोर बोलणार आहे. जोपर्यंत सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून अधिकृतपणे वाल्मिक कराडला अटक झाली की हे सांगितलं जात नाही तोपर्यंत मी काहीही बोलणार नाही. पोलिसांसमोर हजर व्हायचं की नाही यावरुन वाल्मिक कराड आणि त्यांच्या आकांमध्ये द्वंदयुद्ध सुरु असल्याचा दावा आमदार सुरेश धस यांनी यावेळी बोलताना केला आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासावर मी समाधानी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सर्व यंत्रणा 150-200च्या स्पीडने कामाला लावल्या आहेत. ते म्हणतात ना, ‘ बकरे की माँ कब तक दुवा माँगेगी’. या प्रकरणातही दुवा फारकाळ चालणार नाही, दुवा अर्ध्यातच सुटणार असल्याचंही आमदार धस यांनी स्पष्ट केलंय.
अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचं आश्वासन
अन्यथा बीडचा बिहार नाही तर काबुलीस्तान होणार…
जिल्हा पोलिस दलातील अधिकारी चिरीमिरी घेऊन लोकांना पिस्तूल परवाना देत आहेत, कोणाही उठतंय आणि पिस्तूल परवाने काढत आहेत. कोणी लग्नात वर करुन दाखवत आहे, तर कोणी लक्ष्मीपूजनाला, चौकात, ढाब्यावर ठ्यॉय, ठ्यॉय करतंय, बीडमधील हे ठ्यॉय, ठ्यॉय लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी संपवावं, जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही तर त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी यावेळी आमदार सुरेश धस यांनी केलीयं.
पिस्तुलासाठी शिफारसी करणाऱ्या आमदारावरही कारवाई करा…
बीडमध्ये ज्या लोकांच्या पिस्तूल परवान्यासाठी आमदाराने शिफारसी केल्या असतील, त्याने आपलं पद भाड्याने दिलं असेल, त्या सर्व शिफारसी ऑन आणि ऑफ रेकॉर्ड तपासाव्यात. मी जरी शिफारस केली असेल तर माझ्यावरही कारवाई झाली पाहिजे. मी आयुष्यात फक्त दोनच शिफारस केलेल्या आहेत. माझ्याकडेही अनेक लोकं लाडं-लाडं पिस्तूल मिळण्यासाठी येतात, त्यांनी मी धुडकावून लावतोय. मी स्वत;ला कधी बंदुक मागितली नाही इतरांना कसं देऊ, त्यामुळे पिस्तुलासाठी शिफारसी करणाऱ्या आमदारावरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केलीयं.