Deputy CM Ajit Pawar visit Massajog : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे (Massajog) सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरण राज्यात गाजत आहे. या हत्याप्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली असून, काही आरोपी फरार आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा या प्रकरणात मुख्य आरोपी असल्याचा आरोप केला जात आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण सभागृहात उचलून धरले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जाईल, असे जाहीर केले जाईल. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आज मस्साजोग येथे जावून देशमुख कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हेही मस्साजोग येथे आले होते. त्यांनी कुटुंबाची सांत्वन केले.
मस्साजोगच्या घटनेचा सुत्रधार सापडेपर्यंत शांत बसणार नाहीत; देशमुख कुुटुंबाच्या भेटीनंतर पवारांची प्रतिक्रिया
अजित पवार म्हणाले, सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणात दोषी असणाऱ्यांची कोणाचीही राज्य सरकार गय करणार नाही. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होण्यासाठी राज्य सरकार, मी स्वतः लक्ष ठेवून आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. याप्रकरणाचा मास्टरमाईंड) कोणीही असो त्या शोधून काढणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री व माझे या प्रकरणात बारीक लक्ष आहे. याप्रकरणात कुणाचाही दबाव येऊ नये म्हणून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये तपास सुरू आहे. याप्रकरणाची न्यायालयाच्या मार्फतही चौकशी केली जाणार आहे. चौकशी करत असताना त्रुटी राहू नये म्हणून या बदलची खबरदारी घेतली जात आहे.
धनंजय मुंडेंविरुद्ध ग्रामस्थ आक्रमक
अजित पवार यांनी देशमुख कुटुंबीयांची घेऊन आस्थेवाईकपणे चौकशी करून सांत्वन केले. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने व निःपक्षपातीपणे होण्यासाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन त्यांची राज्याच्या मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी मस्साजोग ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.