मस्साजोगच्या घटनेचा सुत्रधार सापडेपर्यंत शांत बसणार नाहीत; देशमुख कुुटुंबाच्या भेटीनंतर पवारांची प्रतिक्रिया

  • Written By: Published:
मस्साजोगच्या घटनेचा सुत्रधार सापडेपर्यंत शांत बसणार नाहीत; देशमुख कुुटुंबाच्या भेटीनंतर पवारांची प्रतिक्रिया

Sharad Pawar on Santosh Deshmukh Murder : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाली. त्यानंतर या विषयाची राज्यभरातच नाही तर देशभरात चर्चा आहे. (Santosh Deshmukh) यामध्ये राजकीय हस्हक्षेप असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे महाराष्ट्राच्या विधानसबेतही पडसाद उमटले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यची घोषणा केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज देशमुख कुटंबाला भेट दिली आहे.

Sharad Pawar Beed visit : शरद पवार आज बीडमध्ये; संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेणार

येथे बोलत असताना पवार म्हणाले, या प्रकरणी कोण जबाबदार आहेत, कोण सूत्रधार आहे त्यांना योग्य धडा शिकवला पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकार, लोकप्रतिनिधी, वकील अनेक लोक हितचिंतक म्हणून कुटुंबियांच्या पाठीशी आहेत. मुख्यमंत्र्यांनी काही आश्वासन दिली, कितीही रक्कम दिली तरी गेलेला माणूस परत येणार नाही असंही पवार म्हणालेत. तसंच, कुटुंबाचे दुःख दूर होणार नाही. खासदार सोनावणे यांनी झालेली घटना संसदेत मांडली. सूत्रधार कोण याच्या खोलात गेले पाहिजे..वस्तुस्थिती ही समोर येईल असंही पवार यावेळी म्हणाले.

बीड जिल्ह्याला मोठी वारकरी परंपरा आहे. या जिल्ह्यात जर अशा दहशद माजवणाऱ्या घटना घडत असतील तर हे गंभीर आहे. या घटनेच्या मुळाशी जावून यामध्ये नक्की कोण दोषी आहे हे शोधल पाहिजे अशी मागणीही पवारांनी यावेळी केली आहे. त्याचबरोबर जी देशमुख कुटुंबाला मदत दिली त्यामधून माणूस परत येणार नाही. परंतु, त्यांच्या कुटुंबाला थोडी मदत नक्की होईल असंही ते यावेळी म्हणाले.

मुलीच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलला

संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च आम्ही करतोल, तुम्ही त्याची चिंता करू नका असं आश्वासनही शरद पवार यांनी यावेळी देशमुख कुटुंबाला दिलं आहे. त्यांनी यावेळी उपस्थित असलेल्या आपल्या सहकाऱ्यांना सांगून या मुलीच्या शिक्षणासाठी जे  काही आवश्यक आहे ते लगेच पाहा अशा सुचनाही दिल्या आहेत. त्यामुळे मुलीच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याचं चित्र आहे. यावेळी बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदिप क्षिरसागर उपस्थित होते.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube