Dhananjay Mundhe X post New veterinary degree college in Parli : आज झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यात मंत्री धनंजय मुंडे यांचा मतदारसंघ असलेल्या परळीमध्ये नवे पशुवैद्यक पदवी महाविद्यालय होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्याबद्दल मंत्री मुंडे यांनी त्यांच्या एक्स या सोशल मिडीया हॅण्डलवर माहिती दिली. त्यात त्यांनी फडणवीसांचे आभार देखील मानले.
मिशन टायगर! पुण्यातील बड्या नेत्याचं बंड थांबवण्यासाठी ठाकरेंचा हुकमी ‘एक्का’ मैदानात
यामध्ये मुंडे म्हणाले की, राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत आमच्या परळी विधानसभा मतदारसंघातील परळी वैद्यनाथ येथे नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली असून यासाठी ५६४.५८ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
कानडा राजा पंढरीचा! श्रोते मंत्रमुग्ध, राहुल देशपांडेंना ईशा यक्ष महोत्सवात मिळालं स्टँडिंग ओव्हेशन
याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब तसेच पशू संवर्धन मंत्री आणि माझ्या भगिनी पंकजाताई मुंडे यांचे मनःपूर्वक आभार…
राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत आमच्या परळी विधानसभा मतदारसंघातील परळी वैद्यनाथ येथे नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली असून यासाठी ५६४.५८ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) February 25, 2025
… म्हणून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला होतोय फायदा, पॅट कमिन्सचा धक्कादायक दावा
परळी मतदारसंघात कृषी महाविद्यालय, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, सोयाबीन संशोधन व प्रक्रिया केंद्र, सीताफळ इस्टेट या शासकीय शिक्षण-प्रशिक्षण संस्था अलीकडच्या काळात मंजूर करण्यात आलेल्या आहेत. त्यापाठोपाठ पशुवैद्यक पदवी महाविद्यालय मंजूर झाल्याने हे प्रगतीच्या वाटेवर आणखी एक विश्वासात्मक पाऊल ठरणार आहे! अशी माहिती धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये दिली आहे.