Download App

आनंदाची बातमी! पिंपरी-चिंचवड ते भूम परांडा बससेवा सुरू; आरोग्यमंत्री सावंतांचा पुढाकार

एसटी बस सेवा वाल्हेकरवाडी (चिंचवड) ते परांडा-भूम वाशी बस आजपासून प्रवाशांच्या सेवेत सुरू झाली आहे.

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील भूम, परांडा आणि वाशी तालुक्यांतील नागरिकांनी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात स्थायिक होत आपले रोजगार आणि उद्योग-व्यवसाय उभारले आहेत. नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीच्या आधारावर, आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी राज्य परिवहन महामंडळाला आदेश दिले आणि अखेर नागरिकांच्या सोयीसाठी तातडीने कार्यवाही करत एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे.

एसटी बस सेवा वाल्हेकरवाडी (चिंचवड) ते परांडा-भूम वाशी बस आजपासून प्रवाशांच्या सेवेत सुरू झाली आहे. या सेवेचा शुभारंभ गिरीराज सावंत, संस्थापक, कार्यसिद्धी प्रतिष्ठान, पुणे यांच्या हस्ते बसचे पूजन व चालक-वाहकांचा सत्कार करून करण्यात आला. या नव्या बससेवेने भूम, परांडा, वाशी तालुक्यांतील पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गाच्या कामास सुरूवात, 22 महिन्यांत काम होणार पूर्ण.. राणाजगजितसिंह पाटलांची माहिती

या सेवेमुळे पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील नागरिकांना आता गावी जाण्यासाठी अधिक सोयीस्कर पर्याय उपलब्ध झाला आहे, याचा फायदा अनेक नागरिकांना होईल. बससेवा सुरू झाल्याने नागरिकांतूनही समाधानाची भावना व्यक्त केली जात आहे.

यावेळी गिरीराज सावंत यांच्यासह या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये चंद्रकांत सरडे (सामाजिक कार्यकर्ते), सचिन चिंचवडे, समाधान सोलंकर अध्यक्ष), शरद जाधव, प्रशांत पाटील, उद्योजक चंद्रहास वाल्हेकर, समाधान भोरे (सरपंच जांब), मनोज मारकड, काका मारकड, नितीन कोपनर, सतीश पाटील, बंडू मारकड, बिबीशन घोडके, लक्ष्मण मिसाळ, अर्जुन लष्कर, राजाभाऊ जाधव, बाबा माळी, रवींद्र बागडे, परमेश्वर कोपनर, अंकुश खांडेकर, समाधान बुधनर, तानाजी कोपनर, नागनाथ वायकुळे, धनाजी गाडे, प्रभाकर कोळेकर, अक्षय वायकुळे, दादा कोपनर, गणेश देवकाते, शरद काळे, सुनील मुके, विठ्ठल कारंडे, सुरेश मारकड, विनायक वायकुळे, अभिजीत वायकुळे, वसुदेव कोपनर, तात्या कोपनर, हनुमंत ठोंबरे व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोठी बातमी : छ.संभाजीनगर अन् धाराशिव नावं तशीचं राहणार; हस्तक्षेपास ‘सुप्रीम’ नकार

follow us