माझ्या पत्नीचे फोटो का दाखवले?…, चौघांनी कट रचून मित्राचा केला खून

या घटनेतील एका आरोपीचा संबंध होमगार्ड दलाशी असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

News Photo   2026 04 27T163114.667

माझ्या पत्नीचे फोटो का दाखवले?..., चौघांनी कट रचून मित्राचा केला खून

बीड जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Beed) येथे ‘माझ्या पत्नीचे आक्षेपार्ह फोटो का दाखवले? असा जाब विचारत चार मित्रांनी मिळून आपल्याच एका मित्राची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची भयानक घटना बीड जिल्ह्यातील बेलुरा येथे घडली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी चक्क एक होमगार्ड असल्याने जिल्ह्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं चित्र आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमित गवते असं मृत युवकाचं नाव आहे. आरोपी आणि सुमित हे एकमेकांचे मित्र होते. घटनेच्या दिवशी आरोपींनी सुमितला ‘तुझ्याकडं काम आहे असं सांगून बोलावून घेतलं. मात्र, तिथे पोहोचताच पूर्वनियोजित कटानुसार आरोपींनी त्याच्यावर हल्ला चढवला. यामध्ये फिर्यादीनुसार, गावातीलच रुस्तुम गोवर्धन गवते, ज्ञानेश्वर दत्ता लाटे, आणि खंबा लिंबा येथील सुरज नागरगोजे या तिघांनी हा कट रचला होता.

ती तुझी नाही माझी झाली; बीडच्या केज तालुक्यात एकजणाला मारहाण

सुमितला घट्ट धरून ठेवलं. त्यानंतर गावातीलच त्याचा मित्र रितेश सतीश बहिर याने हातातील धारदार शस्त्राने सुमितच्या अंगावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात सुमितचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणात तत्परता दाखवत एका आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. रुस्तुम गवते याच्या पत्नीचे आक्षेपार्ह फोटो सुमितने का दाखवले किंवा का पसरवले, या रागातून हा टोकाचा निर्णय घेतल्याचं आरोपीने सांगितलं आहे.

या घटनेतील एका आरोपीचा संबंध होमगार्ड दलाशी असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रक्षकच जर भक्षक बनू लागले, तर सामान्य जनतेने कोणाकडे पाहायचे? बीड जिल्ह्यात गुंडांवरील पोलिसांचा धाक संपला आहे का? असे संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.

Exit mobile version