गुजरातमधील अहमदाबाद गुन्हे अन्वेषण शाखा आणि महसूल गुप्तचर संचालनालय(DRI) कडून मोठी महाराष्ट्रात मोठी कारवाई करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका कारखान्यावर छापा मारुन कोकेन, केटामाइन आणि एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. तब्बल 500 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.
मराठा आरक्षणाला EWS चा पर्याय दिला का? शिंदे सरकारच्या शासकीय जाहिरातीवर चव्हाणांचा सवाल
छत्रपती संभाजीनगरमधील कारखान्यात रसायनांची निर्मिती दाखवून ड्रग्ज तयार केली जात असल्याचे तपासात समोर आले आहे. गुजरात पोलिसांकडून कारवाई करण्यात आल्यानंतर या ड्रग्जचा पुरवठा कुठे केला जात होता, यासंदर्भात पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे देशभरातील उच्च सुरक्षा यंत्रणाही अॅक्टिव झाल्या आहेत.
‘चुलीत गेला पक्ष मराठा आरक्षणच आमचं लक्ष्य’; जरांगेंच्या समर्थनात ‘मराठा’ मैदानात
रसायनाच्या कारखान्यामध्ये तब्बल 200 कोटी किमतीचे ड्रग्ज तयार करण्यात आले होते, तर 300 कोटी रुपयांचा कच्चा मालही आढळून आला आहे. काही दिवसांत या कच्च्या मालापासून 300 कोटी रुपयांची ड्रग्ज तयार करण्याची तयारी होती. मिळालेल्या माहितीनुसार, कारवाई पूर्ण झाली आहे.
खडसे नावामुळं मला डावलल जातं असेल तर…; रक्षा खडसेंनी जाहीरपणे व्यक्त केली नाराजी
गुजरात पोलिसांना ड्रग्ज निर्मितीची माहिती मिळाल्यानंतर अहमदाबाद गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या माहितीची खात्री केली. त्यानंतर डीसीपी आणि गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यांनी दोन पथके तयार करून तपास सुरू केला.
राजस्थान विधानसभा निवडणुकासाठी भाजपची दुसरी यादी जाहीर, वसुंधरा राजेंसह 83 उमेदवारांना तिकीट
तपासादरम्यान ही माहिती खरी आढळून आली असून छत्रपती संभाजीनगर येथील या कारखान्याची खरी लिंक सापडली आहे. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने डीआरआयची मदत घेत ही मोठी कारवाई केली.
दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे उघड करण्यात आलेली नाहीत. मिळालेल्या माहितीनूसार जितेश कुमार प्रेमजी भाई हिंहोरिया (44) याला एनडीपीएस कायदा कलम 22,28,29 अंतर्गत अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.