Download App

आता सरकारी रुग्णालये दोनशे-चारशे दिवसांत बांधून होतात; तानाजी सावंतांची फटकेबाजी

  • Written By: Last Updated:

धाराशिव: भूम (Bhum) येथील 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय आणि नवीन बसस्थानकाचे भूमिपूजन आरोग्यमंत्री व पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री सावंत यांनी जोरदार राजकीय फटकेबाकी केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी (Congress-Ncp) सरकारच्या दहा-पंधरा वर्षांच्या काळात हॉस्पिटल अर्धवट राहिले होते. घाणेरडे काम झाले होते. पूर्वी दहा-वीस वर्षांचा काळ सरकारी रुग्णालय उभारण्यासाठी लागत होते. आता हॉस्पिटल हे दोनशे-चारशे दिवसांत बांधून होतात, असे पालकमंत्री सावंत म्हणाले.


महेश जाधवांकडून फेसबुक पोस्ट केली डिलिट…अमित ठाकरेंवर केला होता आरोप

पालकमंत्री सावंत म्हणाले, भूम येथील रुग्णालयासाठी 24 कोटी 53 लाखांचा निधी मिळाला आहे. येत्या चारशे दिवसांत हे रुग्णालय बांधायचे आहे. परंत इतका दिवस वाट पाहत बसायचे नाही. दहा महिन्यात काम पूर्ण झाले पाहिजे. हे चॅंलेज कंत्राटदाराने स्वीकारले पाहिजे आहे. शासकीय कामे दोनशे वर्ष, वीस वर्ष, दहा वर्ष अशी होता, अशी जुन्या लोकांची धारणा आहे. पण आता नव्या पिढीकडे वेळ नाही. जग वेगात पुढे चालले आहे. स्पर्धेत टिकायचे असेल वेगाने विकास करावा लागतो. दहा महिन्यात देखणी इमारत उभी करायची आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात रुग्णालयाचे कामे अपूर्ण राहिली होती. अनेक हॉस्पिटल अपूर्ण होती. सगळ्यांना अल्टिमेटम देऊन कामे पूर्ण करून घेतली आहे. आता पूर्वीची पद्धत राहिलेले नाही. सरकारी रुग्णालये विदेशातील रुग्णालयासारखी झाली आहेत.

MLA Disqualification : वर्षा बंगल्यावर तातडीची बैठक, राजकीय चर्चांना उधान

प्रा.डॉ.सावंत म्हणाले, या नवीन बसस्थानकाला लवकरात लवकर पूर्ण करून जनतेच्या व प्रवाशांच्या सेवेसाठी कार्यान्वित करावे. या ठिकाणी पिण्याचे स्वच्छ पाणी, प्रवाशांना बसण्यासाठी सुविधा, महिला व पुरुष चालक वाहक यांच्यासाठी आराम कक्ष व हिरकणी कक्षही असणार आहे. शहरातील जुन्या बसस्थानकाला लोकल आणि तालुका अंतर्गत बसेससाठी वापरण्यात येणार आहे. नवीन बसस्थानकातून जिल्हा आणि तालुक्याच्या बाहेरील वाहनाकरिता वापरण्यात यावा असा सल्लाही पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांनी यावेळी दिला.

आरोग्य उपसंचालक डॉ.अर्चना भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.इस्माईल मुल्ला, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास, उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक चेतना खिरवाडकर व तहसीलदार सचिन खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

follow us