महेश जाधवांकडून फेसबुक पोस्ट केली डिलिट…अमित ठाकरेंवर केला होता आरोप

महेश जाधवांकडून फेसबुक पोस्ट केली डिलिट…अमित ठाकरेंवर केला होता आरोप

Mahesh Jadhav : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव (Mahesh Jadhav ) यांनी मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले. जाधव यांनी जखमी अवस्थेत स्वतःचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. व्हिडिओमध्ये त्यांनी अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दरम्यान, हा व्हिडिओ महेश जाधव यांनी डिलिट केला आहे. या व्हायरल व्हिडिओनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महेश जाधव यांच्यासह इतरांची हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर जाधव यांनी हा व्हिडिओ डिलिट केला आहे.

नेमकं काय घडलं होतं?
नवी मुंबईमध्ये मंगळवारी माथाडी कामगार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला. खारघरमधील मेडिकव्हर रुग्णालयासमोर हा राडा झाला. यामध्ये माथाडी कामगार नेते महेश जाधव यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला. महेश जाधव यांना अमित ठाकरे यांच्याकडून मारहाण झाल्याचा आरोप त्यांनी केला.

अमित ठाकरेंकडून मारहाण, माथाडी कामगार नेते महेश जाधवांचा गंभीर आरोप

माथाडी कामगार नेते महेश जाधव यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मनसे नेते अमित ठाकरे यांनी आपल्याला शिवीगाळ करुन जबर मारहाण केल्याचा गंभीर आरोप यावेळी जाधव यांनी केला आहे. महेश जाधव यांनी राज ठाकरेंची टीम खंडणी गोळा करत असल्याचा गंभीर आरोप केला. जाधव हे मनसे माथाडी कामगार युनियनचे अध्यक्ष आहेत. पण आता जाध यांनी थेट अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. महेश जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत. आता सध्या ते खारघरमधील मेडिकव्हर रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्याचवेळी त्या परिसरात उपस्थित असल्या मनसे सैनिकांना महेश जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी चांगलीच मारहाण केली.

दरम्यान, या व्हायरल व्हिडीओनंतर मनसेने महेश जाधव यांच्यासह कामगार सेनेवर कारवाई केली आहे. मनसेने एक परिपत्रक जारी केलं आहे. यामध्ये म्हटलं आहे की, सर्व महाराष्ट्र सैनिकांना कळवण्यात येत आहे की, राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मराठी कामगार सेना या संघटनेची आणि संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे

follow us
  • fb
  • instagram
  • youtube