MLA Disqualification : वर्षा बंगल्यावर तातडीची बैठक, राजकीय चर्चांना उधान
MLA Disqualification : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या निवासस्थानी तातडीची बैठक बोलण्यात आली आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री, पोलीस महासंचालक आणि आयुक्त देखील या बैठकीला उपस्थित आहेत. आमदार अपात्रतेचा (MLA Disqualification) उद्याच्या निकालानंतर कायदा सुव्यस्थेवर चर्चा होण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या आमदार अपात्रतेचा निकाल उद्या चार वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जाहीर करणार आहेत. यासंदर्भात मुंबई आणि महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीचे ज्येष्ठ नेते वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत.
महायुतीच्या सरकारसमोर मराठा आरक्षण आणि उद्याचा निकाल हे दोन मोठे प्रश्न आहेत. विधानसभा अध्यक्षांचा निकाल काय असणार आहे याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे. उद्याच्या निकालाने महाराष्ट्राचे राजकारण बदलू शकेल का? याची देखील उत्सुकता लोकांना लागून राहिली आहे. या निकालाचे पडसाद राज्यात उमटले आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्ना निर्माण झाला तर त्यावरील उपाययोजनांसाठी ही बैठक आयोजित केली आहे.
‘सरकार स्थिर राहणार’ म्हणणाऱ्या फडणवीसांवर पवारांचा पलटवार; म्हणाले, निकाल..,
अवघ्या 24 तासांवर निकाल आल्याने या बैठकीला वेगळं महत्व प्राप्त झाले आहे. पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात येण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे यांनी मुंबईतील आंदोलनासाठी जोरदार तयारी केली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या दृष्टीने महायुतीला कोणताही धोका घ्यायचा नाही.
गद्दार बाद झाले नाही तर समजायचं की..,; आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यादृष्टीने कायदा सुव्यवस्था आणि आगामी काळातील रणनीती नेमकी काय असायला पाहिजे? यासंदर्भात बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवल्याची माहिती समोर आली आहे. तातडीने बोलवलेल्या या बैठकीसाठी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देखील बैठकीला उपस्थित आहेत.