‘सरकार स्थिर राहणार’ म्हणणाऱ्या फडणवीसांवर पवारांचा पलटवार; म्हणाले, निकाल..,
Sharad Pawar On Devendra Fadnvis : संपूर्ण राज्याचं सध्या अपात्र आमदारांच्या निकालाकडे लागलं आहे. अपात्र आमदार प्रकरणाच्या निकालाला अवघे काही तासच उरले आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांकडून वेगवेगळे दावे केले जात असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnvis) दाव्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पलटवार केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना निकाल माहिती असेल, असा पलटवार पवार यांनी केला आहे.
Ravindra Dhangekar यांना लोकसभेची हसीन स्वप्न पडताय; चंद्रकांत पाटलांवरील टीकेवर भाजपचा टोला
शिवसेनेच्या अपात्र आमदार प्रकरणी सर्वोच्च न्यायालायाच्या आदेशाने राज्य विधी मंडळात सुनावणी सुरु होती. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयाने निकाल सोपवला होता. त्यानूसार राहुल नार्वेकर यांच्या देखरेखीखाली मागील काही दिवसांपासून मॅरेथॉन सुनावणी सुरु असल्याची परिस्थिती होती. कारण हिवाळी अधिवेशनादरम्यानही ही सुनावणी पार पडत होती.
मला जेलमध्ये जावं लागलं तरी चालेल, पण… आमदार तनपुरेंचा सरकारवर हल्लाबोल
सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकीलांनी युक्तिवाद करीत आपली बाजू मांडण्याचा प्रयत् केला आहे. या सुनावणी दरम्यान शिंदे गटासह ठाकरे गटाकडून वेगवेगळ्या दाव्यांवरुन पुरावेदेखील सादर करण्यात
आले होते. त्यानंतर सुनावणीला दिरंगाई होत असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आला होता. या प्रकरणी ठाकरे गटाने न्यायालयाचे दार पुन्हा ठोठावल्याचं पाहायला मिळालं होतं.
शाहरुखच्या ‘डंकी’ची बॉक्स ऑफिसवरील हवा ओसरली, 19 व्या दिवशी सर्वात कमी कमाईची नोंद
ठाकरे गटाच्या तक्रारीनंतर सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना फटकारल्याचंही दिसून आलं होतं. अखेर सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना 31 डिसेंबरपर्यंत निकाल देण्याबाबतचे आदेश दिले होते. मात्र, राहुल नार्वेकरांनी मुदतवाढ घेतली होती. नार्वेकरांनी निकालासाठी मुदतीची मागणी केल्यानंतर न्यायालायने त्यांना 10 जानेवारीपर्यंतच मुदत दिली आहे. त्यामुळे आता उद्या दुपारी 4 वाजता राहुल नार्वेकर हे निकाल जाहीर करणार असल्याची शक्यता आहे.
काय म्हणाले होते फडणवीस?
शिंदे गटाची भक्कम बाजू असून सरकार स्थिर राहणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर योग्य कायदेशीर निर्णय देणार आहेत. आम्ही राज्यात कायदेशीर सरकार स्थापन केलं असून नार्वेकरांच्या निकालातून आम्हाला न्याय मिळणार असल्याची अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती.