गद्दार बाद झाले नाही तर समजायचं की..,; आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र

गद्दार बाद झाले नाही तर समजायचं की..,; आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र

Aaditya Thackeray : गद्दार बाद झाले नाही तर समजायचं की, भाजपला संविधान बदलायचयं, असे टीकास्त्र माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केले आहे. दरम्यान, अपात्र आमदार प्रकरणी काय निकाल लागतो याकडंच सर्वाचं लक्ष असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलीयं. त्यावरुन आता विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले जात आहे.

अमित ठाकरेंकडून मारहाण, माथाडी कामगार नेते महेश जाधवांचा गंभीर आरोप

आदित्य ठाकरे म्हणाले, गद्दार आमदारांनी तेव्हाच राजीनामा द्यायला हवा होता आणि निवडणुकीत सामोरं जायला पाहिजे होतं. पण गद्दार आमदारांमध्ये हिंमत नाही. म्हणूनच ते आज मंत्री झाले आहेत. उद्या 10 तारखेला जर गद्दार बाद झाले नाहीत तर समजायचं की भाजपला संविधान बदलायचं असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.

आई आहे की राक्षशीण! पोटचा गोळा संपवला अन् मृतदेह बॅगेत भरुन निघाली पण..,

तसेच आम्ही न्याय मागत आहोत तो तुमच्याकडून मागत आहोत. कारण महाराष्ट्राची जनता आहे आणि आम्ही आहोत आपल्या सगळ्यांचा विश्वास बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहून दिलं आहे त्यावर आहे. अपात्र आमदार प्रकरणी उलटा निर्णय लागला तर मग तुम्ही लक्षात घ्या की २०२४ मध्ये भाजपाला जे संविधान लिहायचं आहे त्या दिशेने हे चालले आहेत. एका बाजूला भाजपाचं संविधान आहे दुसऱ्या बाजूला बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान आहे तुम्ही कोणतं निवडणार? हा प्रश्न महत्त्वाचा असल्याचं ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.

‘एका माकडाने काढले दुकान’ गाण्यावर किंग खानच्या लेकीचा डान्स, व्हिडीओ पाहून सलील कुलकर्णी म्हणाले…

घटनाबाह्य मुख्यमंत्री शिंदे खुर्ची घट्ट धरुन बसलेत…
एकीकडे घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खुर्ची धरुन बसले आहेत. तर काही लोकं खुर्चीवर चढण्याच्या प्रयत्नात आहेत. तर काही जॅकेट घालूनच तयार आहेत. अशी सर्व सर्कस सुरु असली तरीही घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेत लोकांची गर्दी कमी असते, खुर्च्या जास्त फिरत आहेत. मुख्यमंत्री शिंदे गरागरा फिरतात नंतर ते शेताकडे जात असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube