Download App

Jalna Maratha Protest : तुषार दोषींच्या बदलीला स्थगिती नाही पण… केसरकरांच्या विरोधानंतर फडणवीसांचा ‘हा’ निर्णय

  • Written By: Last Updated:

Jalna Maratha Protest : जालन्यातील मराठा आंदोलकांवर (Jalna Maratha Protest) घडलेल्या लाठीचार्जप्रकरणी पोलिस अधीक्षक तुषार दोषींना (Tushar Doshi) आधी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर दोषी यांची पुण्यात सीआयडीचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. या बदलीवरुन मराठा आंदोलकांनी आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. या प्रकरणावरुन मंत्री दीपक केसरकरांनी (Deepak keserkar) तुषार दोषी यांच्या बदलीला स्थगिती देण्याची मागणी केली होती. यासंदर्भात मंत्री दीपक केसरकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं होतं.

केसरकरांच्या विरोधानंतर फडणवीसांचा ‘हा’ निर्णय

त्यामुळे तुषार दोषींच्या या बदलीला होणारा मराठा समाजाचा, विरोधकांचा आणि विशेषतः मंत्री दीपक केसरकर यांचा विरोध पाहता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुषार दोषी यांच्याबाबत एक निर्णय घेतला आहे. यामध्ये तुषार दोषींच्या बदलीला स्थगिती देण्यात आली नाही. मात्र त्यांची दुसऱ्या पदावर बदली करण्यात आली आहे. त्यामुळे तुषार दोषींची ही तीन दिवसात दुसऱ्यांदा बदली झाली आहे. आता पुण्यात सीआयडीचे पोलीस अधीक्षक ऐवजी आता तुषार दोषी हे पुणे लोहमार्ग पोलिस अधीक्षक या पदावर बदली झाली आहे.

Jitendra Aawhad : पक्षासाठी अजित पवारांनी काहीही केलेलं नाही; सुनावणी दरम्यान आव्हाडांनी केले आरोप

दीपक केसरकरांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं की, मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत दोषी यांची पुणे सीआयडी पोलिस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अंतरवली सराटी लाठीचार्जप्रकरणी दोषी यांची चौकशी सुरु असून चौकशी पूर्ण होईपर्यंत दोषी यांच्या बदलीच्या आदेशाच स्थगिती देण्याची मागणी दीपक केसरकरांनी पत्राद्वारे केली होती.

वेगवान गोलंदाज नवदीप सैनी अडकला विवाह बंधनात, पाहा फोटो

मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे हे आंदोलनाला बसले होते. त्यावेळी आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यात अनेक जण जखमी झाले होते. त्यामुळे दुषार दोषी हे अडचणीत सापडले होते. स्थानिक स्तरावर लाठीचार्ज झाल्याचा चौकशीत समोर आले होते. दरम्यान, मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केल्या प्रकरणी तुषार दोषी यांच्यासह पोलिस प्रशासनावर संताप व्यक्त करण्यात आला होता. पोलिस अधीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी मराठा आंदोलकांनी केली होती. त्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर आणि बदली करण्यात आली होती. मात्र, मराठा आंदोलकांनी त्यांच्या बदलीवर आक्षेप घेत चौकशी पूर्ण होईपर्यंत बदलीला स्थगिती देण्याची मागणी केली होती.

Tags

follow us

वेब स्टोरीज