Download App

कॉंग्रेसने फक्त तिकीट दिलं अन् नंतर वाऱ्यावर सोडलं, कैलास गोरंट्याल पक्ष नेतृत्वावर संतापले

काँग्रेसने आम्हाला फक्त तिकीट दिले आणि नंतर सर्वांना वाऱ्यावर सोडून दिलं, असा आरोप कैलास गोरंट्याल यांनी केला.

  • Written By: Last Updated:

Kailas Gorantyal : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) दारुण पराभव करत महायुतीने (Mahayuti) पुन्हा एकदा सत्तेवर दावा केला. महायुतीच्या (Mahayuti) या लाटेत मविआचा धुव्वा उडाला. एकेकाळी महाराष्ट्रात निर्विवाद सत्ता असणाऱ्या काँग्रेसला (Congress) केवळ 16 जागांवर समाधान मानावं लागलं. या पराभवानंतर आता जालन्यातील कॉंग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल (Kailas  Gorantyal) यांनी पक्षाला घरचा आहेर दिला.

अंडर-19 आशिया चषकात भारताला धक्का, हाय व्होल्टेज सामन्यात पाकिस्तानकडून 44 धावांनी पराभव 

काँग्रेसने आम्हाला फक्त तिकीट दिले आणि नंतर सर्वांना वाऱ्यावर सोडून दिलं, असा आरोप कैलास गोरंट्याल यांनी केला.

कैलास गोरंट्याल यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, प्रदेश काँग्रेस कमिटीने ज्या पद्धतीने निवडणुका लढवायला हव्या होत्या, त्या पद्धतीने लढल्या नाहीत. आम्हाला पक्षाकडून कुठलाही रिस्पॉन्स मिळाला नाही, काँग्रेसने आम्हाला फक्त तिकीट दिले आणि नंतर सर्वांना वाऱ्यावर सोडून दिलं, असं गोरंट्याल म्हणाले. काँग्रेसच्याच काही लोकांनी जालना मतदारसंघात गद्दारी केल्याचा आरोपही त्यांनी केला.

मोठी बातमी : अरविंद केजरीवालांच्या सुरक्षेत मोठी चूक, ग्रेटर कैलासमध्ये हल्ला; पाहा व्हिडिओ 

जालना विधानसभा निवडणुकीत गोरंट्याल यांना दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांचा शिंदे गटाच्या अर्जुन खोतकर यांनी पराभव केला आहे.

महायुतीचा विजय नाही, हा पैशांचा विजय…
पुढं बोलतांना ते म्हणाले की, शिवसेना आणि भाजपच्या प्रत्येक उमेदवाराला पक्षाने 40 ते 50 कोटी रुपये दिले. अदानींनी धारावी झोपडपट्टीचे काम मिळायला पाहिजे म्हणून त्यांना हे पैसे दिल्याचं आपण ऐकल असल्याचं गोरंट्याल यांनी सांगितलं. जालना मतदारसंघात विरोधकांनी सरासरी दीड लाख लोकांना पैसे वाटले. त्यामुळे हा भाजप आणि शिवसेनेचा विजय नसून पैशाचा विजय असल्याचं गोरंट्याल म्हणाले.

काँग्रेसने एकही सभा घेतली नाही

काँग्रेसने एकही सभा घेतली नाही. जी काही सामग्री द्यायला पाहिजे होती, ती दिली नाही. वरून पक्षातल्या लोकांनी गद्दारी केली. त्यांची आपण वरिष्ठ पातळीवर तक्रार केल्याचे गोरंट्याल यांनी सांगितले.

विरोधकांनी धार्मिक ध्रुवीकरण केल्याचं दिसून आलं. त्यामुळे हिंदूंमध्ये भीती निर्माण झाली आणि त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना झाला. त्याचवेळी काँग्रेसची पारंपारिक व्होट बँक मात्र विभागली गेली. त्यामुळं आपला पराभव झाल्याचं गोरंट्याल म्हणाले.

follow us