Download App

लातूरमध्ये शरद पवार गटाला बळ; विनायकराव पाटलांचा प्रवेश निश्चित

Vinayakrao Patil : सध्याच्या राजकारणात अनेक नेते दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर शरद पवार गटामध्ये पोकळी निर्माण झाल्याचं दिसून आलं होत. त्यानंतर आता लातूरमध्ये मात्र, ही पोकळी भरुन निघाली आहे. भाजपचे नेते विनायकराव पाटील यांनी आपला राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित केल्याचं समोर आलं आहे.

jammu kashmir मध्ये भारतील लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, पाच दहशतवाद्यांचा खात्मा

नूकतीच विनायकराव पाटील यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन आपला प्रवेश निश्चित केला आहे. विनायकराव पाटील लातूर जिल्ह्यात याची मोठी असल्याचं मानलं जात आहे. सध्या राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे. आगामी निवडणुकीत जर तीन पक्ष सोबत लढले तर आपल्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याची होती. त्यामुळेच विनायक पाटील यांनी आपला प्रवेश राष्ट्रवादीत निश्चित केला असल्याचं बोललं जात आहे.

Parineeti Chopra : पिवळ्या ड्रेसमध्ये काळा गॉगल घालत पटाखा कुडी परिणीची चुडा सेरेमनी, पाहा फोटो

कोण आहेत विनायक पाटील?
विनायक पाटील यांना अहमदपूर विधानसभेची उमेदवारी राष्ट्रवादीकडून जाहीर झाली होती. मात्र, विलासराव देशमुख यांच्यामुळे पाटील यांनी ही निवडणूक राष्ट्रवादीतून नाहीतर काँग्रेसकडून लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर त्यांनी 2014 साली विधानसभा निवडणुकीत अर्ज भरला. या निवडणुकीत अपक्ष निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ते भाजपचे बडे नेते मानले जात होते.

फडणवीसांनी शब्द पाळला; दिव्यांग वधूची गैरसोय करणाऱ्या नोंदणी अधिकाऱ्याला सरकारचा दणका

आमदार झाल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षाची ताकद वाढवली.यामुळे २०१९ मध्ये भाजपने त्यांना उमेदवारी दिली. भाजपमधील दिलीपराव देशमुख व अशोक केंद्रे या दोघांनी बंडखोरी केल्यामुळे मताचे विभाजन होऊन पराभवाला सामोरे जावे लागले. ज्याच्यामुळे भाजपच्या उमेदवारांचा पऱाभव झाला त्यांचा पुन्हा पक्षात प्रवेश करून घेऊन जिल्हाध्यक्षपद बहाल करण्यात आले.

Girish Mahajan : ‘संजय राऊतांच्या डोक्याचा इलाज करा’; ‘त्या’ वक्तव्यावर महाजनांचा खोचक टोला

दरम्यान, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप व अजित पवार गट एकत्र निवडणुक लढल्यास आपणास उमेदवारी मिळणे अशक्य होणार आहे, तसेच भाजपमध्येही अनेक स्पर्धक आहेत त्यामुळेच विनायक पाटील यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Tags

follow us