Download App

श्वान तुझ्या ***ला चावल्यावर कळलं…; लक्ष्मण हाके चांगलेच संतापले

तो पापड्या मला श्वान म्हणतो, अरे श्वान तुझ्या ***ला चावल्यावर चावल्यावर तुझी काय हालत होईल, हे तुला कळणारपण नाही, असं हाके म्हणाले.

  • Written By: Last Updated:

Laxman Hake : काल बीडमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित (Vijay Singh Pandit) यांच्या कार्यकर्त्यांत जोरदार राडा झाला. त्यानंतर पंडित यांनीही हाकेंवर सडकून टीका केली. लक्ष्मण हाके हा कुत्रा आहे. ज्या उमेदवारासाठी त्याने प्रचार केला होता, त्याचं डिपॉझिट जप्त झालं. हा दलाल श्वान आहे, अशी टीका त्यांनी केली होती. त्यांचा टीकेला आता हाकेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

प्रतिक्रिया देऊ नका, आरक्षणासाठी जरांगे ॲक्शन मोडमध्ये येताच उपमुख्यमंत्री शिंदेंचे मंत्र्यांना आदेश 

हाके यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केल. पंडित यांनी केलेल्या टीकेविषयी विचारले असता ते म्हणाले की, तो पापड्या मला श्वान म्हणतो, अरे श्वान तुझ्या ***ला चावल्यावर तुला समजेल. हे श्वान चावल्यावर तुझी काय हालत होईल, हे तुला कळणारपण नाही, असा इशारा हाकेंनी दिला. पुढं ते म्हणाले, काल पोलिस प्रशासनाने आमच्यावर गुन्हे दाखल केले. पोलिसांना त्यांचं काम केलं. मात्र, जी तत्परता आमच्यावर गुन्हे दाखल करताना पोलिसांनी दाखवली, तेवढी तत्परता जरांगे नावाच्या साडेअठ्ठावीस किलो माणसाच्या कृतीवर दाखवा ना? जरांगे महाराष्ट्राला अराजकतेकडे घेऊन जातोय, मुख्यमंत्र्याची आय-माय काढतोय, शिवराळ बोलतोय, त्याला नोटीस का मिळत नाही? ओबीसींना एक न्याय अन् जरांगेंना दुसरा न्याय असं कायद्यात लिहिलं का?, असा सवाल हाकेंनी केला.

टॅरिफ वाद सुरू असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांचा पीएम मोदींना फोन; वाचा, नक्की काय घडलं? 

सरकारकडून जरांगेंचे लाड
मी कायदा पाळणार माणूस आहे, मी आजवर संविधानाची भाषा बोलत आलोय. आम्ही मुख्यमंत्र्यांची आयमाय काढत नाही. जरांगे अराजकता निर्माण करतोय, त्याच्यावर कारवाई का होत नाही? सरकराकडून जरांगेंचे लाड सुरू आहे, असं हाके म्हणाले.

जरांगे कोण लागून गेलाय? जरागेंना काय कळतं आरक्षणातलं? आरक्षण द्यायला तुझ्या बाबाचा कायदा आहे का? मोर्चा घेऊन गेल्यावर आरक्षण मिळतं का? राज्य मागासवर्ग आयोगाला अधिकार आरक्षणाचा असतो, मुख्यंत्र्यांना नसतो. आणि आयोगाने मराठा समाजाचे सामाजिक मागासलेपण नाकारलं. आता तुम्हाला बोगस कुणबी नोंदी तयार करून ओबीसींच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करायची का?, असा सवाल हाकेंनी केला.

follow us