Download App

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज; फडणवीसांना घेरत पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar : मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation Protest) जालन्यातील आंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनात पोलीस आणि आंदोलकात जोरदार धुमश्चक्री उडाली. पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. यात अनेक आंदोलक जखमी झाले. यानंतर विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली.

जालन्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांचा लाठीचार्ज, आंदोलकांकडूनही दगडफेक

शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, मला जालन्यातून काही जणांचे फोन आले. त्यानंतर घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी आंदोलकांशी विचारविनिमय केला. त्या चर्चेत सगळं शांततेत सुरू होतं. मात्र, चर्चेनंतर पोलीस बळाचा वापर करून तिथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला गेला. यात आंदोलकांवर लाठीहल्ला केला. एकदा चर्चा केल्यानंतर लाठीहल्ला किंवा बळाचा वापर करण्याची काहीच गरज नव्हती. मात्र, अलीकडे अशा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे कुठलेही प्रश्न असले आणि ते उत्तर न मिळाल्याने रस्त्यावर आले तर बळाचा वापर करावा, अशी राज्याच्या गृहमंत्र्यांची सूचना असावी, असा आरोप शरद पवार यांनी टीव्ही 9 वृत्तवाहिनीशी बोलताना केला.

पोलिसांना काय दोष देणार, वरच्या पातळीवरून सूचना आल्या आणि त्यांनी कामगिरी केली. या प्रकारामुळे पोलीस आणि तरुणांत कटुता मात्र वाढली. याची पूर्ण जबाबदारी राज्य सरकार आणि गृहखात्याची जबाबदारी असणाऱ्यांची आहे, असे पवार (Sharad Pawar) म्हणाले. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. हे थांबविण्यासाठी त्या लोकांना तिथे जाऊन धीर द्यावा लागेल, असेही शरद पवार म्हणाले.

अजित पवारांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, ‘त्यांना मुंबईचं हित कळत नाही’

Tags

follow us