जालन्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांचा लाठीचार्ज, आंदोलकांकडूनही दगडफेक
जालना : आरक्षण मिळविण्यासाठी मराठा समाजाच्या (maratha reservation) वतीने जालन्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलन करण्यात येत होते. गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू होते. शुक्रवारी सायंकाळी आंदोलनकर्ते व पोलिसांमध्ये वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यावरून जोरदार गोंधळ उडाला. त्याचवेळी जोरदार दगडफेक सुरू झाली. या दगडफेकीत दहा ते बारा पोलिस (Police) जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दगडफेकीनंतर पोलिसांनी हवेत गोळीबार केला आहे. त्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला आहे.
अजित पवारांनी दिला ‘मिशन 48’ चा नारा; सुप्रिया सुळेंचे टेन्शन वाढले
मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी जालन्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरू झाले होते. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या तालुक्यातील वीस ते बावीस गावांमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला होता. या आंदोलनाला पाठिंबा वाढू लागला होता. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील अनेक गावांतही बंद पुकारण्यात आला. येथील तरुणांनी आंदोलनाच्या समर्थनार्थ सराटी गावांत दुचाकी रॅली काढण्यात आली होती.
‘महाराष्ट्रात काँग्रेस फुटली नाही’; राहुल गांधींचा पवार-ठाकरेंना टोला
या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही यांनी घेतली होती. गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याशी मोबाइलद्वारे संपर्क साधला होता. परंतु जरांगे यांनी उपोषण मागे घेतला नाही. शुक्रवारी अनेक गावांतून पाठिंबा वाढू लागला होता. त्यामुळे शुक्रवारी पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मोठा गोंधळ उडाला. संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी दगडफेक सुरू केली. तर पोलिसांनी प्रत्युत्तरात जोरदार लाठीचार्ज केला. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला. यात काही पोलिस आणि आंदोलनकर्तेही जखमी झाले आहे.
मराठा समन्वयक समितीकडून निषेध
मराठा आरक्षण समन्वयक समितीचे विनोद पाटील यांनीही या प्रकाराचा निषेध नोंदविला आहे. आरक्षणासाठी बसल्यानंतर त्यांच्यावर लाठीचार्ज करण्याचे कारण काय आहे. हा कुठला न्याय आहे. याचा मी निषेध करतो, अशी प्रतिक्रिया विनोद पाटील यांनी दिली आहे.