Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारकडे मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर ओबीसीमधील काही जातींना कशाच्या आधारावर आरक्षण देण्यात आलं आहे? असा सवाल देखील यावेळी जरांगेंनी केलाय.
उद्या आंतरवाली सराटीत बैठकीचं आयोजन…
दरम्यान मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीमध्ये बैठक आयोजित केली आहे. यामध्ये ते मराठा आंदोलकांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते त्यांच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. त्यामुळे जरांगे काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच ते यावेळी असं देखील म्हटले आहेत की, मराठ्यांना आरक्षण न देणं हे सरकारचं षडयंत्र आहे. त्यांना मराठ्यांना मोठं होऊ द्यायचं नाही.
शरद पवारांनी उपोषणावर मौन सोडलं
मनोज जरांगे(Manoj Jarange) यांना सरकारने विश्वास दिला होता, त्यामुळे आता मनोज जरांगे यांना दोष देता येणार नसल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी मौन सोडलं आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांनी याआधी आमरण उपोषण केलं, तेव्हा शरद पवारांनी मनोज जरांगे यांना पाठिंबा दिला होता. आता पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.
Mukesh Ambani : मुकेश अंबानींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; ई मेल पाठवत 20 कोटींची मागणी
केंद्राने अंग काढून घेतले?
तर दुसरीकडे राज्यात मराठा आरक्षणाचा (Martha Reservation) प्रश्न चिघळला आहे. त्यात गुरूवारी पंतप्रधान मोदी राज्यात येऊन गेले. मात्र त्यांनी मराठा आरक्षणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यावर देखील जरांगेंसह विरोधकांनी निशाणा साधला. त्यानंतर आता मराठा आरक्षण प्रश्नी तूर्तास हस्तक्षेप टाळत केंद्राने अंग काढून घेतल्याचं चित्र आहे.