Aali Ga Bhaagabai Song: तेजस्विनी पंडितचा जबरदस्त डान्स; ‘आली आली गं भागाबाई’ गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला’

Aali Ga Bhaagabai Song: तेजस्विनी पंडितचा जबरदस्त डान्स; ‘आली आली गं भागाबाई’ गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला’

Aali Ga Bhaagabai Song Release Out: एखाद्या गीताची अनोखी जादू अथवा लोकप्रियता सिनेमाला एक अनोखी ओळख  निर्माण करून देत असते. (Marathi Movie) अनेक सिनेमा एखाद्या हिट गाण्यांमुळे ओळखले जात असल्याचे आपल्याला बघायला मिळत असते. असंच  एक जोरदार गीत आगामी ‘एकदा येऊन तर बघा’ (Ekda Yeun Tar Bagha) या धमाल सिनेमातून आपल्या भेटीला आलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saregama Marathi (@saregamamarathi)


प्रसाद खांडेकर (Prasad Khandekar) दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ (Ekda Yeun Tar Bagha Marathi Movie) या सिनेमातील ‘आली आली गं भागाबाई’ हे पारंपरिक गीत नव्या अंदाजात सादर केलं आहे. नुकतंच हे गीत प्रदर्शित झालं असून या गीताला प्रेक्षकांनी मोठी पसंती दर्शवली आहे. हे गीतरोहन प्रधान यांनी गायलं आहे.

मंदार चोळकर यांच्या गीतलेखनाला रोहन-रोहनयांचं संगीत लाभलं आहे. या गाण्यातून सिनेमातील सर्व कलाकारांचा ढिंच्याक अंदाज बघायला मिळत आहे. या गीताची आणि सिनेमाच्या कथेची गंमत सिनेमा बघितल्यानंतरच उलगडणार आहे. सिनेमाच्या गीताचे हक्क ‘सारेगम’ कडे सोपविण्यात आले आहे.

२४ नोव्हेंबर दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ या सिनेमाची निर्मिती परितोष पेंटर, राजेश कुमार मोहंती, दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपकपेंटर यांचीअसून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायणमूरथी, डॉ.झारा खादर यांची आहे.

Singham Again: सिंघम परत येतोय… रोहित शेट्टीच्या ‘सिंघम 3’ची झलक पाहिलीत का?

तसेच गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम, विशाखा सुभेदार,  तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, राजेंद्र शिसातकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार आदि मनोरंजन सृष्टीतील कसलेल्या कलाकारांची भली मोठी फौज या सिनेमात आहे. लेखक अभिनेता प्रसाद खांडेकर ‘एकदा येऊन तर बघा’ या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शकीय पदार्पण करत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube