Manoj Jarange On Chhagan Bhujbal: मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्दावरून आज अंबड येथील सभेत ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेत बोलतांना मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार टीका केली. राजकीय नेत्यांना गावबंदी केली जाते, महाराष्ट्र काय तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिलाय का? मी तुरंगात झुणका भाकरी खाल्ली, मी सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही, अशा शब्दात त्यांनी जरांगेंचा समाचार घेतला. यावर आता जरागे पाटलांनी प्रत्युत्तर दिलं.
India Vs Australia: भारत-ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप कोण जिंकणार? थलायवाने केली भविष्यवाणी
अंबड येथील छगन भुजबळांच्या भाषणानंतर मनोज जरांगेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना भुजबळ यांनी केलेल्या टीकेविषयी विचारले असता जरांगे म्हणाले की, राज्यात शांतता राहू नये म्हणून आता ओबीसी नेत्यांचे सगळे प्रयत्न सुरू झाले. त्यामुळं ते काहीही बोलतात. मी किती शिकलो, हे त्यांना काय ठाऊक? ते शिकले, ते खूप शिकले. पण लोकांचे खाऊन जेलमध्ये जाऊन आले, अशी खोचक टीका जरांगेंनी केली.
मराठा व्होट बँक, भुजबळांचं एकमुखी नेतृत्व अन् फडणवीसांसोबतचा वाद : पंकजांची जालन्याकडे पाठ!
जरांगे म्हणाले की, राज्यात दंगली होतील, असं त्यांनी बोलू नाही. मराठा आणि ओबीसी यांच्यात वाद होऊ देणार नाही. कारण तेही आमचे बांधव आहेत. कितीही टीका केली, तरी टीकेला उत्तर द्यायला आम्ही खंबीर आहोत. मात्र, आम्हाला त्यांना महत्वाचंच द्यायच नाही. तुम्ही काहीही बोला, मात्र, आम्ही आमची पातळी कमी होऊ देणार नाही, असं जरांगे म्हणाले.
ते म्हणाले, आता भुजबळांचं वय झालं, आता आम्ही त्यांना महत्व देणार नाही. आम्ही तुमचासुध्दा बायोडेटा गोळा केला आहे. इथं सासरा आणि जावयाचा प्रश्नच नाही. तुम्हीच आमच्या पायावर पाय देऊ नका. तुम्ही वयाने मोठे आहात. भान ठेऊन बोला. याना राज्यात शांतता ठेवायची नाही, असं पलटावर जरांगेंनी केला.
भुजबळ काय म्हणाले?
मनोज जरांगे हे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून ५० टक्के मर्यादेत आरक्षण द्यावे, अशी मागणी करत आहेत. याच मुद्द्यावरून भुजबळांनी जरांगेंवर टीका केली. आता मराठा समाजाचा नवा नेता तयार झाला. मला मराठा तरुणांना सांगायचे आहे की याच्या कुठं मागं लागला, दगडाल शेंदूर फासून देव झाला, त्याला काही कळंना, वळणा… आरक्षणाच्या मुद्दावरून राजकीय नेत्यांना गावबंदी केली. महाराष्ट्रचा सातबारा काय तुमच्या नावावर केलाय? असा सवाल भुजबळांनी केला. मला आरक्षण मिळालं, ते कायद्यानं मिळालं, वारंवार मला म्हटलं जातं की, कुणाचा खाताय… तुझं खातोय का रे? तुझ्या सारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही, अशी टीका भुजबळांनी केली.