Download App

नेत्यांच्या दिवाळी फराळाला जाणार असाल तर…; जरांगेंनी पुन्हा केलं आवाहन

  • Written By: Last Updated:

छ. संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे विरूद्ध राज्य सरकार समोरासमोर आहे.  मराठा समाजाला सरसकट आरक्षणासाठी सरकारला जरांगेंनी 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ दिला असून, लवकरच मनोज जरांगे (Manoj Jarange) राज्यव्यापी दौरा सुरू करणार आहे. त्याआधी आरक्षणासाठी सर्वांनी शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन करत मराठा समाजाचे जे कार्यकर्ते नेत्यांनी बोलावलेल्या दिवाळी फराळाला जाणार आहेत त्यांनी फराळापूर्वी आरक्षणाबाबतचा जाब विचारण्याचे आवाहन केले आहे. डॉक्टरांनी आज तपासणी करायची आणि उद्या सुट्टी करायची असे सांगितले आहे. त्यानुसार उद्या (दि. 12) सकाळी अंतरवलीकडे रवाना होणार असून, शिष्टमंडळ काय करतं बघू नाही तर पुढची भूमिका जाहीर करू. ते पत्रकारांशी बोलत होते. (Monoj Jarange On Politician Diwali Function)

‘मदत करनेवाला बडा होता है, तुमचं विमान वेळेवर आलं नसतं तर…’; खडसेंचा मुख्यमंत्र्यांना फोन

जरांगे पाटील म्हणाले की, सध्या सगळीकडे दिवाळी सणाचा मोठा उत्साह आहे. अनेक नेते मंडळींकडून दिवाळी फराळासह अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. या कार्यक्रमांना मराठा समाजाचे जे कार्यकर्ते उपस्थिती लाववणार असतील त्यांनी सर्वात आधी त्यांनी मराठा समाजासाठी काय केलं हे विचारावं.

आता रेशन कार्डवर मोफत मिळणार साडी : राज्याच्या वस्त्रोद्योग विभागाचा निर्णय

24 डिसेंबरनंतरच्या आंदोलनाची तयारी करा

मराठा समाजाला सरसकट आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी जरांगे पाटलांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा अवधी दिला आहे. तर, सरकारकडून 31 डिसेंबरपर्यंतची वेळ मागितली आहे. त्यामुळे जरांगेच्या वेळेत सरकारकडून आरक्षणावर काय तोडगा काढला जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असून, आरक्षणाच्या मुद्द्यावरून हार मानून कुणीही आत्महत्या करु नये असे आवाहन करत मराठा समाजाने 24 डिसेंबरनंतरच्या आंदोलनाची तयारी करण्यास सांगितले आहे. जातीपेक्षा पक्षाला, नेत्याला मोठं मानून लेकराच वाटोळ करु नका. जाणार असाल, तर मराठा आरक्षणाचा प्रश्न आधी मांडा” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

…तर गोरगरिबांचं कल्याण होईल

मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना आवाहन करण्याबरोबर जरांगेंनी यावेळी राज्यघराणे, संस्थानांनाही आवाहन केले आहे. ते म्हणाले की, राजघराण्यांनी, संस्थानिकांनी त्यांची दप्तर, त्यांच्याकडच्या नोंदी सरकारी अभ्यासकांना उपलब्ध करुन देण्याची विनंती केली आहे. असे केल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळेल आणि गोरगरीबांच कल्याण होईल.

अजितदादा अमित शहांच्या भेटीवरही केले भाष्य

शरद पवारांची काल (दि. 10) पुण्यात भेट घेतल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची दिल्लीत भेट झाली. या भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढले गेले. यावर जरांगे यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, अजित पवारांनी अमित शहा यांची भेट कशासाठी घेतली याची अधिकृत माहिती आपल्याकडे नाही. मराठा आरक्षणासाठी घेतली की, त्यांच्या कामासाठी घेतली हा त्यांचा प्रश्न असून, आरक्षणासाठी घेतली असेल तर, चांगली गोष्ट आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असावी अशी आशा व्यक्त करु असेही जरांगे म्हणाले.

Tags

follow us