Download App

मागेल त्याला ‘कुणबी’ दाखला म्हणताच धनुभाऊंचे कानं टाईट; जरांगेंनी सांगितलं अंतरवलीतलं खरं

ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या, त्यांच्या आधारावर मागेल त्या मराठ्याला कुणबी दाखला द्या, असं म्हणताच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कानं टाईट केल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलंय.

Manoj Jarange Patil : ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या, त्यांच्या आधारावर मागेल त्या मराठ्याला कुणबी दाखला द्या, असं म्हणताच कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhanjay Munde Patil) यांचे कानं टाईट झाल्याचं मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी सांगितलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे राज्यभरा शांतता रॅलीच्या माध्यमातून जाहीर सभा घेत आहेत. बीडमध्ये आज शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.

Kanguva 2: ‘सूर्या’च्या चाहत्यांसाठी खास भेट; निर्मात्याने केली ‘कांगुआ 2’ बाबत मोठी घोषणा

मनोज जरांगे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु असताना सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा आलं. त्यावेळी मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, संदीपान भुमरे यांच्यासह धनंजय मुंडे आले होते. अंतरवाली सराटीमध्ये सरकारच्या मंत्र्यांसोबत चार गोष्टींवर चर्चा झाली होती. विदर्भात कुणबी समाजाला शेतीच्या व्यवसायाच्या आधारे ओबीसीतून आरक्षण देण्यात आलंय.

कुणबी आणि मराठ्यांच्या जुन्या नोंदी सरकारला सापडलेल्या आहेत. त्यामुळे मराठा आणि कुणबी एकच आहे. दोघांचेही व्यवसाय शेती आहेत. त्याचं आधारावर मराठवाड्यासह महाराष्ट्रातील मराठ्यांना कुणबीचे दाखले देण्यात यावेत. याच आधारावर ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही, त्या मागेल त्या मराठ्याला कुणबीचा दाखला देण्यात यावा… मी असं म्हणताच धनंजय मुंडे यांने कानं टाईट झाल्याचं दिसून आल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलं आहे.

Pooja Khedkar : पूजा खेडकर पुणे व्हाया वाशिम.. रुजू होताच म्हणाल्या, सॉरी मी..

उपोषणादरम्यान, अंतरवली सराटीमध्ये सरकारच्या शिष्टमंडळाशी सर्वच मागण्यांवर एकमत झालं होतं. त्यानंतर पुढील महिन्याभरात याबाबत पाऊल उचलली जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, या बैठकीमध्ये मंत्री गिरीश महाजन डाव टाकणार असल्याचं मला माहित होतं, मी क्षत्रिय आहे डाव राखूनच ठेवत असल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.

मागेल त्याला कुणबी दाखला म्हणताच मुंडे काय म्हणाले?
मागेल त्या मराठ्याला कुणबीचा दाखल देण्यात यावा, असं म्हणताच धनंजय मुंडे म्हणाले हे तर सरसकटच झालं. त्यावर मनोज जरांगे म्हणाले, आम्हाला सरसकटच हवं आहे, त्यावर गिरीश महाजन म्हणाले सरसकट शब्दामुळे ओबीसी नेत्यांच्या पोटात दुखंत आहे, त्यामुळे सरसकट शब्दाला दुसरा पर्याय शोधा, असं महाजनांनी सांगितल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलंय.

follow us