केवळ राजकीय दबावामुळे एमआयडीसीची अधिसूचना काढली जात नाही…; रोहित पवारांचे टीकास्त्र
Rohit Pawar : कर्जत – जामखेडमधील एमआयडीसीचा (Karjat – Jamkhed MIDC) मुद्दा राज्यभर चर्चेत आहे. भाजप आमदार प्रा. राम शिंदे ( Ram Shinde) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यात एमआयडीसीच्या मुद्यांवरून सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत आहे. दरम्यान, आता रोहित पवार यांनी एमआयडीसीच्या मुद्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. एमआयडीसीची अधिसूचना केवळ राजकीय दबावामुळं काढली जात नसल्याचा आरोप रोहित पवारांनी केला.
IAS पूजा खेडकरबद्दल आणखी एक धक्का! 17 लाखांचं घड्याळ, 6 दुकाने, 7 फ्लॅट अन्…
माझ्या मतदारसंघातील #MIDC ची अधिसूचना केवळ राजकीय दबावामुळं काढली जात नाही. लोकशाहीच्या पवित्र मंदिरातही वारंवार खोटी आश्वासनं देऊन फसवणूक केली जातेय… अखेर याविरोधात मतदारसंघातील युवांच्या हितासाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उपोषण सुरु केलं… राज्यात #मविआ चं सरकार येणार आणि… pic.twitter.com/Y6u8Pj70V1
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 11, 2024
Kanguva 2: ‘सूर्या’च्या चाहत्यांसाठी खास भेट; निर्मात्याने केली ‘कांगुआ 2’ बाबत मोठी घोषणा
कर्जत जामखेडमध्ये एमआयडीसी व्हावी यासाठी आमदार रोहित पवार यांनी सातत्याने सरकार दरबारी नेटा लावला आहे. मात्र, अद्याप त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. आज विधानसभेच्या पायऱ्यांवरही रोहित पवारांनी कर्जत जामखेड एमआयडीसीच्या मुद्यावरून आंदोलन केलं. यावेळी त्यांच्याबरोबर शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर, अनिल देशमुख हे देखील उपस्थित होते. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी लिहिलं की, माझ्या मतदारसंघातील MIDC ची अधिसूचना केवळ राजकीय दबावामुळं काढली जात नाही. लोकशाहीच्या पवित्र मंदिरातही वारंवार खोटी आश्वासनं देऊन फसवणूक केली जाते आहे, असं रोहित पवार म्हणाले.
स्टेट बॅंकमध्ये नोकरीची संधी, ‘या’ पदांसाठी भरती सुरू, कोण करू शकतं अर्ज?
पुढं त्यांनी लिहिलं की, अखेर याविरोधात मतदारसंघातील युवांच्या हितासाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उपोषण सुरु केल. राज्यात मविआचं सरकार येणार आणि त्यावेळी हा प्रश्न मी मार्गी लावेलच. पण आमदार म्हणून मतदारांनी सोपवलेली जबाबदारी पार पाडणं माझं कर्तव्य आहे. या सरकारने कितीही अडचणी आणल्या तरी लोकांसाठी लढत राहणार. अपेक्षा आहे, सरकार जागं होऊन MIDC ची अधिसूचना काढेल. मा. उपराष्ट्रपती महोदयही विधिमंडळात येत असून त्यांनाही याबाबत मी विनंती करणार असल्याचं रोहित पवारांनी लिहिलं.
रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
दरम्यान, हे आंदोलन सुरू असतांना राोहित पवारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावून एमआयडीसीच्या मुद्यावर चर्चा केली. याबाबत बोलतांना रोहित पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यासोबत माझी एमआयडीसीच्या मुद्यावर चर्चा झाली. या चर्चेला उद्योगमंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई, आमदार संदीप क्षीरसागर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पाटेगाव-खंडाळा एमआयडीसी होणार म्हणजे होणार असा शब्द दिला. तर मंत्री सामंत यांनी आम्ही एमआयडीचा प्रश्न जुलै अखेरपर्यंत मार्गी लावू, असं सांगितलं