स्टेट बॅंकमध्ये नोकरीची संधी, ‘या’ पदांसाठी भरती सुरू, कोण करू शकतं अर्ज?

स्टेट बॅंकमध्ये नोकरीची संधी, ‘या’ पदांसाठी भरती सुरू, कोण करू शकतं अर्ज?

SBI SCO Recruitment 2024 : तुमचं पदवीचं शिक्षण झालं असेल आणि तुम्हाला बॅंकेत नोकरी (Bank job) करण्याची असेल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. ती म्हणजे, नुकतीच स्टेट बँक ऑफ इंडियान (State Bank of India) विविध पदांच्या भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरती अंतर्गत सिनिअय वाईस प्रेसिटेंट पदांसह अन्य पदे भरली जाणार आहे. या भरती मोहिमेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, याच भरती प्रक्रियेविषयी जाणून घेऊ.

IAS पूजा खेडकरबद्दल आणखी एक धक्का! 17 लाखांचं घड्याळ, 6 दुकाने, 7 फ्लॅट अन्… 

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 3 जुलै 2024 रोजी सुरू झाली. तर अर्ज करण्याची अंतिम मुदत 24 जुलै 2024 आहे.

रिक्त पदांचा तपशील

या भरती अंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एकूण 16 रिक्त पदे भरली जाणार आहेत. ज्यामध्ये उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय पदांचा समावेश आहे. मोहिमेद्वारे सिनिअय वाईस प्रेसिटेंट (IS ऑडिटर) ची 2 पदे, असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट (IS ऑडिटर) ची 3 पदे, मॅनेजर (IS ऑडिटर) ची 4 पदे आणि डेप्युटी मॅनेजर (IS ऑडिटर) ची 7 पदे भरण्यात येणार आहेत.

कोण अर्ज करू शकतो ?

अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे माहिती तंत्रज्ञान/ संगणक विज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन या विषयातील BE/B.Tech पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवारास आवश्यक अनुभव असावा.

उद्या मतदान, क्रॉस व्होटिंगची भीती; चार पक्षांना धाकधूक, शरद पवार अन् काँग्रेस टेन्शन फ्री! 

वयोमर्यादा
सिनिअय वाईस प्रेसिटेंट – 38 ते 50 वर्षे
असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट- 33 ते 45 वर्षे
मॅनेजर – 28 ते 40 वर्षे
डेप्युटी मॅनेजर – 25 ते 35 वर्षे

वेतन
सिनिअय वाईस प्रेसिटेंट- 46 लाख (वार्षिक वेतन)
असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट- 40 लाख (वार्षिक वेतन)

निवड प्रक्रिया

कंत्राटी पदांसाठी उमेदवारांची निवड शॉर्ट-लिस्टिंग, मुलाखत आणि CTC चर्चेनंतर केली जाईल. तर नियमित पोस्टसाठी शॉर्ट-लिस्टिंग आणि मुलाखत होईल. मुलाखत 100 गुणांची असेल. त्यानंतर निवड झालेल्य उमेदवारांची बँकेकडून यादी जाहीर केली जाईल.

अर्ज करण्यासाठी लिंक –
https://recruitment.bank.sbi/crpd-sco-2024-25-10/apply

अधिसूचना – https://sbi.co.in/documents/77530/43947057/02072024_1_ADV_10_IS+Audit.pdf/5b63921c-87e4-4b78-22ca-4357841899ee?t=1417

अर्ज शुल्क किती असेल?

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. सामान्य/EWS/OBC प्रवर्गातील उमेदवारांना 700 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. SC/ST/PWBD उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. अर्ज फी भरण्यासाठी उमेदवार ऑनलाइन मोड/डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंग या पर्यांयांचा वापर करू शकतात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज