Download App

Maratha Reservation: बीडमध्ये भडका ! आमदार संदीप क्षीरसागरांचे घर, कार्यालय पेटवले

  • Written By: Last Updated:

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation</strong>) सुरू असलेले आंदोलन सोमवारी हिंसक झाले आहे. मराठवाड्यात आंदोलनकर्त्यांनी जाळपोळ सुरू केली आहे. बीड जिल्ह्यात दोन आमदारांचे घरे पेटविण्यात आले आहे. बीडमधील माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या निवासस्थानला आग लावण्यात आली. त्यानंतर बीड शहरात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर ( Sandip Shirsagar) यांचे निवासस्थानाला आंदोलनकर्त्यांनी आग लावली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालयही पेटवून देण्यात आले आहेत. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या निवासस्थानाबाहेरील पाच ते सहा वाहने जळाली आहेत.


राजीनामा सत्र सुरूच! मराठा आरक्षणासाठी हेमंत गोडसेंनी दिला राजीनामा, शिंदे गटाला मोठा झटका

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन तीव्र केले आहे. राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. परंतु मराठवाड्यात आंदोलनाची धग जास्त आहे. त्यात आता आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. मराठवाड्यात दोन दिवसांपासून तोडफोड, जाळपोळ सुरू झाली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने दक्षता घेऊन पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. नेते, शासकीय कार्यालयांना पोलीस बंदोबस्त आहे. त्यानंतर आंदोलकही दगडफेक करत आहे. तसेचही वाहने पेटवून देत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश; हिवाळी अधिवेशनापूर्वी विधानसभा अध्यक्षांचा राजीनामा?

बीड जिल्ह्यात सकाळपासून आंदोलन आक्रमक झाले आहेत. माजलगावचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश साळुंके यांच्या घराला आग लावण्या आली आहे. त्यानंत बीड शहरातही आमदार संदीप क्षीरसागर यांचे निवासस्थान व कार्यालयाला आग लावण्यात आली आहे. बीड शहरात बंदोबस्त असतानाही आंदोलकर्त्यांना पोलिसांना चकवत आग लावली आहे. क्षीरसागर यांच्या घराला लावलेला व्हिडिओ हा आता सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहेत. त्यात आग तीव्र स्वरूपाची दिसत आहे.

बीड जिल्हा बंदची हाक
हिंसक आंदोलनामुळे प्रशासनाकडून काही उपाययोजना करण्यात येत आहे. बीड शहरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. तसेच पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आलेला आहे. तर आता बीड जिल्हा बंद करण्याची घोषणाही मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली आहे.

…नाहीतर मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल
मला जाळपोळीच्या घटनांची किंवा हिंसेची माहिती मिळाली तर मला वेगळा निर्णय घ्यावा लागणार असल्याचे विधान मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी केले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटलांचा आजचा सहावा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर बीडमध्ये जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. त्यावरुन जरांगे पाटलांनी हे विधान केले आहे.

follow us