Download App

‘क्रिकेट अन् इतर केंद्र रात्रभर चालतात पण..,’; सभेवर कारवाई होताच जरांगे भडकले

Maratha Reservation : सरकारला क्रिकेट आणि इतर केंद्रे रात्रभर चालतात पण जाहीर सभा चालत नसल्याचं म्हणत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे(Manoj jarange patil) सरकारवर भडकले आहेत. दरम्यान, धाराशिवमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेप्रकरणी पोलिसांनी आयोजकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. रात्री उशिरापर्यंत सभा सुरु असल्याचं कारण देत सरकारने आयोजकांवर कारवाई केली आहे. मनोज जरांगे यांची आज कल्याणमध्ये सभा पार पडली. या सभेनंतर जरांगे पाटलांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

Tiger च्या तिन्ही चित्रपटांमुळे माझं करिअर… टायगर 3 निमित्त सलमानने व्यक्त केल्या भावना

मनोज जरांगे म्हणाले, सरकारने सध्या चांगलं काम सुरु केलं आहे. सरकारला जनतेचं काही देणं घेणं नाही. क्रिकेट रात्रभर चालतं, इतर केंद्रेही चालतात, तिथंही आरडा-ओरडा असतोच त्यांच्या तोंडाला टाके टाकलेले नसतात. आम्ही शांततेत आंदोलन करीत असल्याचं सरकारने समजून घेतलं पाहिजे. ही कायदा अबाधित राहण्यास जमेची बाजू आहे, काही अंशी समाजाचा रोष कमी झालायं. समाजाने शांत रहावं हे मी सांगत असतो आम्हाला खिंडीत पकडायचं म्हणल्यावर पुढं आम्ही बघणार असल्याचा इशाराच मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे.

Mohit Kamboj : खरे मर्द असाल तर… बावनकुळेंच्या फोटो अन् व्हिडिओच्या दाव्यावर कंबोज यांचं राऊतांना आव्हान

तसेच मराठा आरक्षणासाठी राज्यभरात सभा होत आहेत. या सभांवर पोलिस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. आम्ही आमचं शांततेत आंदोलन करीत आहोत. राज्य सरकारचा पोलिस प्रशासनावर दबाव असेल म्हणूनच पोलिस कारवाई करीत आहेत. पण पोलिसांच्या कारवाईला आम्ही घाबरणार अन् खचणारही नसल्याचंही मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं आहे.

सर्वत्र यशस्वीरित्या सभा पार पडत असतानाच धाराशिवमध्ये जरांगे पाटलांच्या सभेवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. रात्री उशिरापर्यंत सभा आयोजित केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटलांची सभा आयोजित करणाऱ्या आयोजकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Sanjay Raut : ‘भाजपवाल्यांची हिट विकेट, याला म्हणतात ‘आ बैल मुझे मार’; राऊतांनी पुन्हा डिवचलं

धाराशिवमध्ये 19 नोव्हेंबर रोजी रात्री 22.00 ते 23.05 पर्यंत जमावबंदीचे आदेश लागू केले होते. पण याचा कालावधीमध्ये धाराशिवमधील वा. सु. हायस्कुल कन्या प्राथमिक शाहा ईट येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय. दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ सभा चालू ठेवून आदेशाचे उल्लघंन करण्यात आल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आलीये.

Tags

follow us