Download App

धक्कादायक! मंत्री शिरसाटांच्या मुलावर विवाहित महिलेचे आरोप; शारीरिक, मानसिक छळ अन् धमकी

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहि महिलेने अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

Maharashtra News : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहि महिलेने अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. सिद्धांतवर या महिलेने फसवणूक, मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचे आरोप केले आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत या महिलेने सिद्धांत शिरसाटला कायदेशीर नोटीस धाडली आहे. शारीरिक, मानसिक छळ, फसवणूक, धमकी या सगळ्याच प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होऊ लागली आहे.

संजय शिरसाट यांच्या मुलावर होत असलेले आरोप नेमके काय आहेत? हा प्रकार नेमका आहे तरी काय जरा समजून घेऊ..

सिद्धांत शिरसाट आणि या महिलेची सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून 2018 मध्ये ओळख झाली होती. ओळखीचे पुढे मैत्रीत रुपांतर झाले. पुढे चेंबूर येथील एका फ्लॅटवर प्रत्यक्ष भेटही झाली होती. सिद्धांतकडून महिलेकडे लग्नासाठी तगादा लावला जात होता. परंतु, महिला आधीच विवाहीत होती.

‘ऑक्सिजन जास्त लागतोय, पेशंटला मारून टाक…’ या डॉक्टरला पहिलं उचला, जितेंद्र आव्हाड संतापले

सिद्धांत यांनी ब्लॅकमेल करत लग्न कर नाहीतर मी आत्महत्या करेन असा आग्रह धरला होता. नंतर सिद्धांतच्या भावनिक आवाहनावर विश्वास ठेऊन लग्न केलं. सिद्धांत शिरसाट यांच्यासोबत 14 जानेवारी 2022 रोजी विवाह केल्याचा दावा महिलेने केला आहे. लग्नानंतर मात्र सिद्धांतच्या वर्तणुकीत बदल झाला. त्यांनी मला चेंबूरमधील फ्लॅटमध्येच राहण्यास सांगितलं. छत्रपती संभाजीनगरला येण्यास नकार दिला होता. तू जर पोलिसांकडे गेली तर मी आत्महत्या करेन आणि तुझं संपू्र्ण कुटुंब उद्ध्वस्त करेन.  माझे वडील लवकरच मंत्री होणार आहेत. ते एकनाथ शिंदे यांचे उजवे हात आहेत, अशी धमकी दिली जात होती असा आरोप या महिलेने केला आहे.

पोलिसांत तक्रार पण कारवाई नाही..

संबंधित महिलेने 20 डिसेंबर 2024 रोजी शाहूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परंतु, या तक्रारीवर पोलिसांकडून काहीच कारवाई झाली नाही. सिद्धांत यांचे वडील मंत्री असल्याने प्रकरण दाबण्यात आल्याचा आरोप कायदेशीर नोटीसीत करण्यात आला आहे. चेंबूर येथे वडिलांच्या नावावर फ्लॅट आहे. या ठिकाणीच सिद्धांत आणि संबंधित महिलेचं लग्न झालं होतं. दोन वर्षे चांगली गेली.

नंतर सिद्धांतचे आणखी एका मुलीसोबत प्रेमसंबंध सुरू झाले. पुढे त्याने या महिलेकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. मानसिक छळ केला. सिद्धांत इमोशनल ब्लॅकमेलही करायचा. या महिलेला त्याने छत्रपती संभाजीनगरला कधीच येऊ दिलं नाही. सात दिवसांच्या आत संबंधित महिलेला नांदवण्यासाठी कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे. अन्यथा महिला अत्याचार कायद्यासह तीन केसेस दाखल करण्यासाठी पुढील कार्यवाही करू असा इशारा महिलेचे वकील अॅड. चंद्रकांत ठोंबरे यांनी दिला आहे.

Video : मुंबई तुंबली अन् आनंद दिघे स्वप्नात आले; एकनाथ कुठय?, संजय राऊतांकडून अमित शहांरही प्रहार

follow us