Amit Shah On India Alliance : ‘तुमचे 40 वर्ष अन् आमच्या 10 वर्षांचा हिशोब करा, आमचंच पारड जड असेल, असं खुलं आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी इंडिया आघाडीच्या (India Alliance) नेत्यांना दिलं आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान अमित शाह यांची अकोला, जळगाव छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभांमधून अमित शाह यांन इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघ ‘काँग्रेसकडेच’ ठेवण्यासाठी विश्वजीत कदमांचा प्लॅन… ठाकरे काय करणार?
अमित शाह म्हणाले, माझं इंडिया आघाडीला खुलं आव्हान आहे, तुमचीही 40 वर्षे सत्ता होती आमचीही दहा वर्षे सत्ता आहे. आपण हिशोब करु पण तुम्ही काय हिशोब करणार तुम्ही नाही करु शकत. तुमचे 40 वर्ष अन् आमच्या 10 वर्षांचा हिशोब करा आमचंच पारड जड असेल कारण मोदींचं काम चांगल असल्याची सडकून टीका अमित शाह यांनी इंडिया आघाडीवर केली आहे.
Tejswini Pandit : मराठी सिनेसृष्टीच्या परिवर्तनासाठी तेजस्विनी सज्ज; लवकरच दिसणार नव्या भूमिकेत
तसेच मागील दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला सुरक्षित केलं आहे. सर्जिकल्स स्ट्राईक करुन पाकिस्तानच्या घरात घूसून आंतकवाद मिटवला आहे. जम्मू काश्मीरमध्ये लागू असलेलं कलम 370 मोदी सरकारने हटवलं आहे. काश्मीर हे आमचं असून मागील 70 वर्षांपासून घमंडी गठबंधनने कलम 370 बेवारस पोरासारखं पाळून ठेवलं होतं, पण 5 ऑगस्ट 2019 ला मोदी सरकारने ते हटवलं असल्याचं अमित शाह म्हणाले आहेत.
‘मराठ्यांनी मर्यादा सोडल्यावर करेक्ट कार्यक्रमच’; जरांगेंचाही CM शिंदेंना थेट इशारा
ज्यावेळी संसदेत जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचं विधेयक मंजूर करण्यात आलं होतं. त्यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विरोध केला होता. ते म्हणाले होते की , जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवू नका, कारण जर हटवलं तर जम्मू काश्मीरमध्ये रक्ताचे पाट वाहतील, पण आज पाच वर्ष जम्मू काश्मीरमध्ये रक्ताचे पाटच काय दगडफेकही झाली नसल्याचं अमित शाह यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.