वाळू माफियांविरुद्ध आमदार विजयसिंह पंडीत मैदानात; तहसिलदारांवर जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई

कोट्यवधी रुपयांची अवैध वाळू उपसा केल्याचं हे प्रकरण खुद्द आमदार विजयसिंह पंडीत यांनीच समोर आणलं होतं.

News Photo   2026 06 15T162356.635

वाळू माफियांविरुद्ध आमदार विजयसिंह पंडीत मैदानात; तहसिलदारांचेही पुराव्याने बुरखे फाडले

गेवराई तालुक्यासह बीड जिल्ह्यातील (Beed) वाळू माफियांविरुद्ध गेवराईचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार विजयसिंह पंडीत यांनी दंड थोपटले आहेत. घरकुल योजनेतील लाभार्थ्यांच्या वाळूवर डल्ला मारणाऱ्यांच्या टोळीचा पर्दाफाश करत पंडीत यांनी थेट गेवराईचे तहसीलदार यांच्यावरच गंभीर आरोप केले होते.

कोट्यावधी रुपयांची घरकुलासाठी दिलेली वाळू तहसीलदारांच्या आशिर्वादामुळं वाळु माफिया आणि महसूलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ब्लॅकमध्ये विकल्याचे पुरावे आणि लेखी तक्रार पंडीत यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडं केली होती. यावर चौकशी समिती नेमल्यानंतर अनेक घरकुल लाभार्थी पुढे आले असून आपल्याकडून ओटीपी घेऊन गेल्यानंतर वाळू मात्र मिळाली नसल्याचे लेखी खुलासे त्यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे.

गाडी येण्याची चर्चा अन् सगळ्या टपऱ्या बंद; तुकाराम मुंढेंच्या सिंघम; स्टाईलमुळं परळीत सकाळपासूनच शुकशुकाट

या प्रकारानंतर जिल्हाधिकारी व प्रशासनाने गेवराईचे तहसीदार यांच्यासह तलाठी, महसूल विभागाचे काही अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती आहे. बीडच्या गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील वाळू घोटाळा प्रकरणात प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे.

गरीब घरकुल लाभार्थ्यांच्या नावाचा गैरवापर करून गोदावरी नदीपात्रातून कोट्यवधी रुपयांची अवैध वाळू उपसा केल्याचं हे प्रकरण खुद्द आमदार विजयसिंह पंडीत यांनीच समोर आणलं होतं. या विषयावर आगामी पावसाठी विधिमंडळ अधिवेशनात आपण आवाज उठवणार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला होता. जिल्हाधिकारी जाॅन्सन यांनी पंडीत यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत वेगवान तपास सुरू केला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सुनावणीनंतर महसूल विभागात खळबळ उडाली असून गेवराईच्या तहसीलदारांसह एकूण ३८ जणांची पाच तास कसून चौकशी व सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीनंतर संबंधित तलाठी, कंत्राटी कर्मचारी आणि १५ वाळू दलालांवर गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Exit mobile version